Home / Uncategorized / राज्यमंत्री दर्जा प्राप्त तथा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांची सावळदबारात सांत्वन भेट…

राज्यमंत्री दर्जा प्राप्त तथा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांची सावळदबारात सांत्वन भेट…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

नामदेव सुपडा नप्ते यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन; विविध गावांतील दुःखी कुटुंबांचीही घेतली भेट

सावळदबारा येथे भारत नप्ते यांच्या घरी राज्यमंत्री दर्जा प्राप्त तथा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांची सांत्वन भेट

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील प्रतिष्ठित नागरिक स्व. नामदेव सुपडा नप्ते (वय ६६) यांचे दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सावळदबारा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून नप्ते कुटुंबीयांचे सातत्याने सांत्वन करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्री दर्जा प्राप्त तथा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांनी सभापती उत्तम चव्हाण यांच्यासह सावळदबारा येथे भारत नामदेव नप्ते, दिपक नप्ते, अरुण नप्ते व अंकुश नप्ते यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्व. नामदेव नप्ते यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी भारत नप्ते व संपूर्ण नप्ते कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन केले. दुःखाच्या या प्रसंगी धैर्याने परिस्थितीला सामोरे जाण्याचे आवाहन करत त्यांनी दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यानंतर इद्रिसजी मुलतानी यांनी सावळदबारा परिसरातील नांदा तांडा, मोलखेडा व हिवरी जामठी या गावांनाही भेट देऊन तेथील शोकाकुल कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीद्वारे त्यांनी दुःखी कुटुंबांच्या भावना जाणून घेत त्यांना मानसिक आधार दिला. समाजातील सुख-दुःखात सहभागी होणे हीच खरी लोकसेवा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या प्रसंगी व्हीजेएटीचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, सभापती उत्तम चव्हाण, पंचायत समिती सदस्य राहुल राठोड, भाऊराव कोलते, एन. आर. कोलते, मुकुंदा मानकर, किसान सूर्यवंशी, डॉ. जफर सय्यद, निलेश राजपूत, गोकुळसिंग राजपूत, गणेश खैरे, विठ्ठल आप्पा काळे, मनोज बुढाळ, लवकेश जाधव, संजय चव्हाण, शंकर अवसरमोल, पंढरी साबळे, देवा आप्पा पंधाडे, शाताराम खराटे यांच्यासह परिसरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सांत्वन भेटीमुळे नप्ते कुटुंबीयांना मोठा मानसिक आधार मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार