छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार.
पांढरी पिंपळगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील शंभूराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळेतील मुख्याध्यापक श्री शिवाजी सखाराम वायाळ हे दिनांक 30 /6 /2026 रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कायम मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यासाठी अनुशेष व सेवा जेष्ठता लक्षात घेऊन श्री मधुकर आसाराम दसपुते हे सेवा जेष्ठ असल्यामुळे त्यांना मुख्याध्यापक पदी 1/7/2026 पासून पदोन्नती देण्यात आली मधुकर दसपुते हे सेवा जेष्ठता यादी क्रमांक एक वर होते दसपुते हे सुरुवातीला विद्यालयाचे पहिले क्रीडा शिक्षक म्हणून 11 जून 1997 ला भाऊसिंगपुरा येथे रुजू झाले होते क्रीडा शिक्षक ते मुख्याध्यापक इथपर्यंत त्यांचा त्रास खूप कष्टाचा व प्रमाणिकपणाचा होता त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहे खूप कठीण परिश्रम त्यांनी घेतले आहे आई-वडिलांचे आशीर्वाद तसेच सर्वांचे सहकार्य यामुळे ते क्रीडा शिक्षक ते मुख्याध्यापक पदापर्यंत पदोन्नती पर्यंत पोहोचले या त्यांच्या पदोन्नतीचे सर्व प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अगदी मनापासून स्वागत केले आहे






