Home / Uncategorized / शिवभक्त महिलेला झालेल्या मारहाण घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शहर बंदची हाक-देऊळगाव राजा शहर कडकडीत बंद

शिवभक्त महिलेला झालेल्या मारहाण घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शहर बंदची हाक-देऊळगाव राजा शहर कडकडीत बंद

 

देऊळगाव राजा मुन्ना ठाकूर 

लोणार तालुक्यातील चिखला काकड या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवल्यावरून झालेल्या वादामुळे शिवभक्त महिलेला झालेल्या मारहाण घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने दि .21 फेब्रुवारी शनीवार रोजी देळगावराजा शहर बंदची हाक देण्यात आली होती . या बदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली तसेच आठवडी बाजार सुद्धा बंद ठेवण्यात आला .देळगावराजा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले .

दिनांक 20 फेब्रुवारी शुक्रवारी रात्री लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरू होत्या . शिवसेनेना उबाठा महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा का हटवत आहे असा विरोध केल्यामुळे सरपंच व त्यांच्या समर्थकांनी गावातील महिला व नागरिकांना जमा करून संजीवनी वाघ यांना मारहाण केली .उपस्थित जमावाने अंगावरचे कपडे फाडून विनयभंग केलं .सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर रात्रीपासूनच व्हायरल झाला .

चिखला काकड गावातील घटनेचे पडसाद देऊळगावराजा शहरात उमटले . .शिवभक्त महिला संजीवनी वाघ यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी देऊळगाव राजा शहर बंद चे आव्हान करण्यात आले . शनिवारी सकाळी आठवडी बाजार असल्यामुळे आठवडी बाजारामध्ये भाजीपाला मालाची आवक झाली होती . मात्र अचानक शहर बंद चे आव्हान आल्यामुळे व्यापारी वर्गात गोंधळ उडाला . यामुळे आंदोलनकर्ते आणि व्यापारी यांच्यामध्ये तुरळक ठिकाणी वाद सुद्धा झाला . पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे शांतता निर्माण झाली .या शहर बंदला देऊळगावराजा शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपापली प्रतिष्ठाने बंद करून .देऊळगावराजा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला .पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनात शहरात सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त अत्यंत चोख ठेवण्यात आला होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार