Home / Uncategorized / पिंपरी राजा येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी..

पिंपरी राजा येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी..

(छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी : श्रीपत पवार)

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपरी राजा (रमाई नगर) येथे दिनांक १ ऑगस्ट रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास करमाड पोलीस स्टेशनचे बीट जमादार, पोलीस कर्मचारी अमोल मारकवाड, कपूर चव्हाण, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे तालुका अध्यक्ष आकाशभैय्या राजपूत तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक व क्रांतिकारी कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार