छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,२९
श्री.स्वामी समर्थ केंद्रात गुरू पोर्णिमा निमित्त बुधवार(ता,२९)रोजी सकाळ पासून विविध कार्यक्रमआयोजित करण्यात आले होते.यात सकाळी सर्व प्रथम स्वामी महाभिषेक कार्यक्रम झाला,नंतर शहरा-तील बहुसंख्य महिला व पुरुषांनी ,स्वामींचे चरित्र
पारायण केले,सकाळी साडे दहा वाजता स्वामींची महा आरती सम्पन्न झाली, गुरू पौर्णिमा निमित्त गुरुपद दिवसभर चालणार आहे.स्वामी सेवेकरी समाधान गडाख यांनी अभिषेक केला.स्वामी सेवेकरी,सुमनबाई आलूले,सुरेश आलूले तसेच
सोनाली त्रिभुवन, अनिता राजपूत,तुषार अनर्थे, सेवानिवृत्त धोंडीराम राजपूत,श्रेयस चव्हाण यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
या प्रसंगी सेवेकरी सर्वश्री सी.के. पवार,सचिन राजपूत
गणेश संतपाळ,सौ,तूपे ताई, धोंडीरामसिंह राजपूत यांची उपस्थिती होती.सकाळ पासून श्री.स्वामींच्या दर्शनासाठी शहराच्या सर्व भागातून सेवेकरीनी व भक्तभाविकांनी मोठी गर्दी केली होती.







