Home / Uncategorized / राजूर घाटात भीषण दुचाकी अपघात; जखमींसाठी देवदूत ठरले आमदार….

राजूर घाटात भीषण दुचाकी अपघात; जखमींसाठी देवदूत ठरले आमदार….

बुलडाणा जिल्हा : सौ.उमा जैवाळ

बालाजी मंदिर, राजूर घाट परिसरात झालेल्या भीषण दुचाकी अपघातातील जखमी नागरिक रस्त्यावर वेदनेने तडफडत असल्याचे पाहताच मी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.

जखमींच्या डोक्याला तसेच हात-पायाला स्वतः रुमाल बांधून रक्तस्राव थांबविण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेची वाट न पाहता माझ्या वाहनासह इतर वाहनांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक श्री. दत्तात्रय बिराजदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जखमींना त्वरित आणि सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना दिल्या.

संकटाच्या क्षणी माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामांबरोबरच प्रत्येक नागरिकाच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहणे ही माझी जबाबदारी आहे. जखमी सर्व नागरिकांनी लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

यावेळी नितीन सुपे, अजय खोत, संतोष जाधव, योगेश मुळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार