Home / Uncategorized / मनमाडला सोडण्याचे आमिष; विवाहितेवर सामूहिक अत्याचार..!

मनमाडला सोडण्याचे आमिष; विवाहितेवर सामूहिक अत्याचार..!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

वैजापूर पोलिसांची तातडीची कारवाई; दोन्ही आरोपी ताब्यात, पोलिस निरीक्षक सत्तेजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू

वैजापूर : मनमाडला सोडण्याचे आमिष दाखवून मध्यप्रदेशातील एका २३ वर्षीय विवाहितेवर मद्य पाजून सामूहिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे देवचंद अशोक भागवत (वय ३५, रा. गवंडगाव, ता. येवला, जि. नाशिक, सध्या रा. पाटील गल्ली, वैजापूर) आणि किरण अशोक पेटारे (वय ४०, रा. वाकला, ता. वैजापूर, सध्या रा. वानवाडी, वैजापूर शहर) अशी आहेत.

पीडित महिला ही मध्यप्रदेशातील रहिवासी असून ती आपल्या पतीसोबत मजुरी करून उदरनिर्वाह करते. जुन्या घरगुती साहित्याच्या खरेदीसाठी ती सोमवारी वैजापूर येथे आली होती. खरेदी पूर्ण झाल्यानंतर मनमाडला जाण्यासाठी वाहनाची प्रतीक्षा करत असताना आरोपींनी तिला “आम्ही मनमाडला सोडतो” असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर ती त्यांच्या दुचाकीवर बसली.

दरम्यान, रस्त्यात पाऊस सुरू झाल्याने आरोपींनी तिला गवंडगाव येथील देवचंद भागवत यांच्या घरी नेले. तेथे दोघांनी मद्यप्राशन केले तसेच पीडितेलाही जबरदस्तीने मद्य पाजल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींनी आलटून-पालटून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने दिली.

घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पीडितेची फिर्याद नोंदवून भारतीय न्याय संहितेतील संबंधित गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर संशयितांचा शोध घेऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

या गंभीर घटनेमुळे वैजापूर परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्तेजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलीस करत असून, घटनेतील सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे. आरोपींविरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया राबविण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार