Home / Uncategorized / देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा अर्थसंकल्प..आ. सौ. श्वेता महाले पाटील.

देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा अर्थसंकल्प..आ. सौ. श्वेता महाले पाटील.

आ. सौ. श्वेता महाले पाटील यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया..

केंद्र सरकारने सादर केलेला २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारत या संकल्पनेला अधिक बळ देणारा असून देशाच्या आर्थिक वाटचालीसाठी दिशा ठरवणारा आहे, अशी प्रतिक्रिया चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ. सौ. श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केली.

आ. सौ. श्वेता महाले पाटील म्हणाल्या की, “जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही भारताने आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवले असून आज देशाची आर्थिक वाढ ७.४ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. ही जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचे स्पष्ट उदाहरण आहे. २०१४ मधील कमकुवत अर्थव्यवस्थेतून भारत आज आत्मनिर्भर, सक्षम आणि विश्वासार्ह अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “सध्याचा अर्थसंकल्प हा गुंतवणूक, उद्योग आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारा आहे. सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करताना प्रत्येक कुटुंब, समुदाय आणि राज्याचा देशाच्या विकासात सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. उत्पादन क्षमता वाढवणे, ऊर्जा, सुरक्षेला बळ देणे आणि दीर्घकालीन स्थैर्य साध्य करणे हे या अर्थसंकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

चालू खात्याच्या तुटीमध्ये (CAD) मोठी घट होऊन ती केवळ ०.८ टक्क्यांपर्यंत आल्याने भारताची परकीय आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परकीय चलन साठा ७०१ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचल्यामुळे जागतिक पातळीवर भारताचा विश्वास वाढला आहे, हेही त्यांनी अधोरेखित केले.

मोदी सरकारने घोषणाबाजीपेक्षा ठोस कृतीवर भर देत स्पष्ट रोडमॅप, उत्तम पायाभूत सुविधा, वित्तीय शिस्त आणि दीर्घकालीन स्थैर्य यावर आधारित अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नसून, देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा दस्तऐवज आहे,” असे मत आमदार श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केले.

 

अर्थसंकल्पामुळे ग्रामीण भागातील विकासाला गती मिळून शेतकरी, युवक, महिला आणि लघुउद्योगांना नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार