Home / Uncategorized / सोयगावात प्रथमच दिव्यांग तपासणी व जागेवरच प्रमाणपत्र वितरण शिबिराचा लाभ घ्यावा; प्राचार्य जीवन कोलते…!

सोयगावात प्रथमच दिव्यांग तपासणी व जागेवरच प्रमाणपत्र वितरण शिबिराचा लाभ घ्यावा; प्राचार्य जीवन कोलते…!

सोयगाव | प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २४ जुलै रोजी भव्य महाआरोग्य शिबिर

सोयगाव;महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार (दि. २४ जुलै) रोजी सकाळी १० वाजल्यापासून उपजिल्हा रुग्णालय, सोयगाव येथे भव्य महाआरोग्य शिबिरासह दिव्यांग नागरिकांची वैद्यकीय तपासणी, नवीन व नूतनीकरण दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोयगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच दिव्यांग बांधवांना त्यांच्या तालुक्यातच तपासणी करून जागेवर प्रमाणपत्र मिळणार असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांच्या विशेष पुढाकारातून हा लोकहिताचा उपक्रम राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला व गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यापूर्वी दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्रासाठी छत्रपती संभाजीनगर येथे सुमारे १५० किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याचे प्रभारी प्राचार्य जीवन कोलते पाटील यांनी बोलताना सांगितले . ही अडचण लक्षात घेऊन मुलतानी यांनी राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांची भेट घेऊन मागणी मांडली होती. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची मोफत तपासणी, दिव्यांग नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना जागेवरच नवीन तसेच नूतनीकरण दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण, आयुष्मान भारत कार्ड वाटप, विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन व नोंदणी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना आदी कल्याणकारी योजनांची माहितीही नागरिकांना दिली जाणार आहे.

या उपक्रमामुळे दिव्यांग नागरिकांना पेन्शन, शिक्षण, रोजगार, घरकुल, बँक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार असून, जिल्हा रुग्णालयापर्यंतची धावपळ, वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

भाजप सोयगाव मंडळ अध्यक्ष संजय पाटील, शहराध्यक्ष मंगेश सोहनी, जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई काळे, माहीम मुलतानी, पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण, राहुल राठोड, जयश्री पवार, नगरसेविका सविता जावळे तसेच भाजप पदाधिकारी शिवाजी बुडाळ, बद्री राठोड, गणेश लोखंडे, जयप्रकाश चव्हाण, सुनील गवांडे, संजीवन सोनवणे, वसंत बनकर, कैलास काळे, राजेंद्र जावळे आदींनी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, महिला व गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी प्राचार्य जीवन कोलते पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार