छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार
बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे दिनांक 27 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या रमाई महिला साहित्य संमेलनात सामाजिक क्षेत्रात व आंबेडकरी चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला या संमेलनात छत्रपती संभाजी नगर येथील ऍड. इंदुमती वराळे यांना रमाई गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आली संमेलन अध्यक्ष प्रतिमा परदेशी तसेच कार्यक्रमाच्या आयोजिका व रमाई मासिकाच्या संपादिका रेखा मेश्राम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला ऍड .इंदुमती वराळे यांनी सामाजिक न्याय महिला सक्षमीकरण आणि आंबेडकरी चळवळीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रधान करण्यात आला त्यांच्या या सन्मानाबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे






