छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्र राज्यतर्फे राज्यस्तरीय सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव
चाळीसगाव;श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मोहनसिंग पवार पाटील यांना ‘राजपूत समाज भूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक तसेच समाजहिताच्या विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.
स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा अॅड. शीला सुखदेवसिंह गोगामेडी, राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंह कटयार तसेच परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या शुभहस्ते व पावन आशीर्वादाने मोहनसिंग पवार पाटील यांचा शाल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
राजपूत समाजात सामाजिक एकात्मता, युवकांना प्रेरणा, समाजसेवा आणि जनजागृतीसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याच्या उद्देशाने हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मोहनसिंग पवार पाटील यांनी समाजहितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे तसेच समाजाच्या प्रगतीसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
या सोहळ्यास श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजबांधव तसेच मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी सहभाग नोंदविला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोहनसिंग पवार पाटील यांनी हा सन्मान संपूर्ण राजपूत समाजाचा असल्याची भावना व्यक्त करत, भविष्यातही समाजहिताची कार्ये अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
मोहनसिंग पवार पाटील यांना प्राप्त झालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






