Home / Uncategorized / सोयगाव : पोलिस खात्यात ऑनलाईन फोन पे वरून लाचखोरी ; लाचलुचपत विभागामार्फत खातेनिहाय चौकशीसह जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा – – – शकील तडवींची मागणी….

सोयगाव : पोलिस खात्यात ऑनलाईन फोन पे वरून लाचखोरी ; लाचलुचपत विभागामार्फत खातेनिहाय चौकशीसह जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा – – – शकील तडवींची मागणी….

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

सोयगाव:

सोयगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बनोटी पोलीस दूर

क्षेत्रातील खाकी वर्दीचा आणखी एक धक्कादायक आणि संतापजनक कारभार चव्हाट्यावर आला आहे. गरीब आदिवासी तरुणाकडून थेट फोनपेच्या ऑनलाईन माध्यमातून सक्तीने हप्ते वसूल करून सोयगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी चक्क ‘हायटेक’ झाले असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांविरुद्ध महिन्याभरापूर्वी तक्रार देऊनही कोणतीही कायदेशीर कारवाई न झाल्याने कमालीचा तीव्र संताप पसरला आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास ‘बिरसा मुंडा क्रांतीवीर आदिवासी महाराष्ट्र राज्य संघटने’ तर्फे आक्रमक पवित्रा घेत छत्रपती संभाजीनगर आमीणचे पोलीस अधीक्षक कार्यालय लोकशाही मार्गाने दणाणून सोडण्याचा तीव्र इशारादिला आहे.

मंगळवार, दिनांक ७ जुलै रोजी ‘बिरसा मुंडा क्रांतीवीर आदिवासी महाराष्ट्र राज्य संघटने’चे संस्थापकीय प्रदेशाध्यक्ष दिलीप गायकवाड आणि अन्यायग्रस्त आदिवासी तरुण शकील तडवी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली कैफियत मांडली. तसेच, २० जुलै २०२६ पूर्वी या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत आणि खातेनिहाय चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. न्याय न मिळाल्यास संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल आणि आमरण उपोषणाचा इशारा संघटनेने प्रशासनाला दिला आहे.

‘सरकारी काम अन् बारा महिने थांब’; गृहमंत्री अन् महासंचालकांकडे धाव घेऊनही महिनाभर प्रशासन सुस्त !

गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील ३२ वर्षीय पीडित तरुण शकील आयतखाँ तडवी हा आदिवासी गरीब कुटुंबातील अल्पभूधारक शेतकरी आहे. पोलीस प्रशासनातील भ्रष्ट साखळीविरुद्ध ‘गल्ली ते दिल्ली’ न्याय मागण्यासाठी या तरुणाने ८ जून २०२६ रोजी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक सदानंद दाते, छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र आणि सिल्लोड-सोयगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितेशकुमार कोल्हे यांना लेखी निवेदने दिली होती. मात्र, सरकारी काम अन् बारा महिने थांब या म्हणीप्रमाणे महिना उलटूनही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील कार्यक्षमतेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लाचलुचपत विभागामार्फत नंबरची चौकशी करा ;

आंदोलकांची मुख्य मागणी गृहरक्षक दलाचा जवान योगेश दिनकर बोखारे हा केवळ एक मोहरा असून, त्याच्या माध्यमातून संपूर्ण सोयगाव तालुक्यात अवैध व्यवसायिकांकडून आणि गरिबांकडून लाखो रुपयांची लाच उकळली जात असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. बोखारे याच्या ‘झहेपशझश’ चे संपूर्ण बैंक रेकॉर्ड आणि पोलिसांना आतापर्यंत केलेले सर्व ट्रान्झंक्शन जप्त करून, या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच, संबधित सर्व आरोपी पोलीस अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ खातेनिहाय चौकशी लावून त्यांना निलंबित करावे आणि कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आदिवासी संघटनेने केली आहे

‘बिरसा मुंडा क्रांतीवीर आदिवासी संघटने’चा थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर तीव्र आंदोलनाचा इशारा ; या भ्रष्ट आणि जुलमी पोलिसांवर २० जुलैची डेडलाईन !

प्रशासकीय आणि संबधितांचे ‘कोट :-

प्रतिक्रिया १) : 

शकील तडवी या इसमाची तक्रार प्राप्त झाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. संपूर्ण प्रकरणाची सत्यता पडताळून योग्य ती आवश्यक आणि कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

नितेशकुमार कोल्हे 

उपविभागीय पोलीस अधिकारी,

सिल्लोड विभाग प्रतिक्रिया 

२) सिल्लोड-सोयगाव, जि. छ. संभाजीनगर) दीड महिन्यापूर्वीच माझी नियुक्ती सोयगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. शकील तडवी यांचा पोलिसांसह गृहरक्षक दलाच्या योगेश बोखारे विरोधातील तक्रारी अर्ज हा गेल्या १७ महिन्यांपूर्वीचा आहे या जुन्या प्रकरणाबाबत मला सविस्तर माहिती नाही. वरिष्ठांकडून जे आदेश येतील, त्यानुसार योग्य कारवाई केली जाईल.

– दिनकर गोरे

सहाय्यक पोलीस निरीक्षक, 

सोयगाव पोलीस ठाणे

) प्रतिक्रिया :-

शकील तडवी हा तरुण कोणाच्या तरी चिथावणीवरून आणि बहकावण्यावरून माझ्याविरुद्ध पूर्णपणे खोट्या तक्रारी करत आहे. तुम्ही पोलीस खात्यात कशी नोकरी करता तेच बघतो, तुम्हाला सस्पेंड करायला लावतो’ असा दम तो मलाच देत आहे.

गजानन आरेकर 

सहाय्यक फौजदार पो. स्टे सोयगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार