Home / Uncategorized / कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया (TL) प्रकरणांत सोयगाव तालुक्याची जिल्ह्यात चमक; डॉ. गितेश चावडा यांना द्वितीय क्रमांकाचा मान…

कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया (TL) प्रकरणांत सोयगाव तालुक्याची जिल्ह्यात चमक; डॉ. गितेश चावडा यांना द्वितीय क्रमांकाचा मान…

 छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी गोकुळ सिंग राजपूत

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरकडून प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान; सामूहिक टीमवर्कमुळे यश मिळाल्याची भावना व्यक्त

सोयगाव;जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त (११ जुलै २०२६) छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित जिल्हास्तरीय गौरव सोहळ्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०२५-२६ या वर्षात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया (TL) कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सोयगाव तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा यांना जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या वतीने द्वितीय क्रमांकाचे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कुटुंब नियोजन व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रमात उत्कृष्ट नियोजन, प्रभावी जनजागृती, लाभार्थ्यांचा सहभाग आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे सोयगाव तालुक्याने उल्लेखनीय यश संपादन केले. या कामगिरीबद्दल जिल्हा आरोग्य विभागाने डॉ. गितेश चावडा यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा विशेष सन्मान केला.

या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. अविनाशजी गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मिन्नू मॅडम, आरोग्य सभापती सौ. रोटे मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO), निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (ADHO) यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

सन्मान स्वीकारल्यानंतर डॉ. गितेश चावडा यांनी या यशाचे श्रेय संपूर्ण आरोग्य यंत्रणेला दिले. त्यांनी सांगितले की, “हा सन्मान माझा एकट्याचा नसून सोयगाव तालुक्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी मित्र, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी, परिचारिका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका आणि सर्व सहकाऱ्यांच्या सामूहिक परिश्रमाचे फळ आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली.”

यावेळी त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. अविनाशजी गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मिन्नू मॅडम, आरोग्य सभापती सौ. रोटे मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी, RMO, ADHO तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

सोयगाव तालुक्यात व सावळदबारा येथे कुटुंब नियोजन कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी लाभार्थ्यांपर्यंत सातत्याने पोहोचणे, जनजागृती, समुपदेशन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून उत्कृष्ट काम करण्यात आले. त्यामुळे जिल्हा स्तरावर तालुक्याचा गौरव झाला असून आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा नोंद घेण्यात आली आहे.

या यशामुळे सोयगाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा उत्साह अधिक वाढला असून भविष्यातही नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण, लोकाभिमुख आणि प्रभावी आरोग्य सेवा देण्यासाठी संपूर्ण टीम कटिबद्ध असल्याचा विश्वास आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा पंचायत समिती सोयगाव यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार