Home / Uncategorized / रुग्णसेवेला सलाम! सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. चेतन ठोंबरे यांचा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांच्या हस्ते गौरव…

रुग्णसेवेला सलाम! सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. चेतन ठोंबरे यांचा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांच्या हस्ते गौरव…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

उपरणे, टोपी व श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती देऊन सत्कार; वैद्यकीय अधिकारी व नागरिकांची उपस्थिती

सिन्नर 

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून कार्य करणारे सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. चेतन ठोंबरे यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय सेवांचा गौरव सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय, सिन्नर येथे आयोजित साध्या पण प्रेरणादायी कार्यक्रमात हा सत्कार संपन्न झाला.

यावेळी डॉ. चेतन ठोंबरे यांना उपरणे, टोपी तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची आकर्षक मूर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागातील बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. ठोंबरे सातत्याने कार्यरत असून, रुग्णांप्रती त्यांची संवेदनशीलता, तत्पर सेवा आणि आपुलकीची वागणूक यामुळे त्यांनी अल्पावधीतच नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सत्कार आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमास ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला सुशील पवार, सहाय्यक अधीक्षक प्रशांत जोशी, रामा लोंढे, कृष्णा खालकर, सागर गोसावी, सार्थक गोसावी, गोविंद गोसावी यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर हे समाजाचे खरे आधारस्तंभ असून, त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. चेतन ठोंबरे यांनी व्यक्त करण्यात आलेल्या सन्मानाबद्दल दत्तात्रय गोसावी व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. हा सत्कार वैद्यकीय सेवेला दिलेली समाजाची कृतज्ञ मानवंदना असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार