छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता.१३
येथील पालिकेच्या पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयातील विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापिका नीता लीलाताई गोकुळ पाटील यांच्या ३९वर्ष सेवेचा सेवा पूर्ती सोहळा रविवार(ता,१२) रोजी लक्ष्मी-नारायण लाँ न येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी या अध्यक्षस्थानी होत्या,तर नगरसेवक साबेरखान,विशाल संचेती,प्रकाश चव्हाण, शिक्षण सभापती बाबासाहेब पुतळे, नगरसेवक हमीद कुरेशी,आमिरअली,पारस घाटे ,नगरसेविका ज्योती जोशी,संगीता राजपूत,सुमैय्या बक्ष ,माजी नगराध्यक्ष राजूसिंग राजपूत ,,यांच्या सह माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत,सेवा निवृत्त विस्तार अधिकारी बाळासाहेब म्हस्के, अंजली जोशी ,श्री शेवतेकर,जी. जी.राजपूत, यांच्या सह शहर व तालुक्यातील शिक्षक संघटना पदाधिकारी, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. नीता पाटील यांनी केलेलेशैक्षणिक कार्य अत्यंत गुणात्मक,व उच्च दर्जाचे होते,त्यांनी शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतले होते ,असे उदगार उपस्थितांनी व्यक्त केले.त्यांचे पती सेवा निवृत्त केंद्र प्रमुख राजेंद्र पाटील, मुख्याध्यापबी.बी.जाधव,सुभाष गोमलाडू ,संदीप शेळके, श्री. तगरे,श्री, बोढरे यांनी तसेच ज्योती दिवेकर,लता सुखासे, वैशाली पगारे,श्रीमती भाकरे, सुनीता वसावे यांनी सहभाग नोंदविला.श्री.पवार,श्री,जगदाळे,श्री. नारायण,यांच्या सह शिक्षण क्षेत्रातील कार्यरत व सेवा निवृत्त शिक्षक जेष्ठ नागरिक साहेबराव साळुंके, कृष्णा कांबळे,पी.वाय चव्हाण ,यांची उपस्थिती होती. शेवटी राजेंद्र पाटील व नीता पाटील यांनी सर्वांना धन्यवाद दिले.(फोटो कॅप्शन–नीता लीलाताई गोकुळ पाटील यांचा व पती राजेंद्र पाटील यांना शुभेच्छा देतांन






