छत्रपती संभाजीनगर गोकुळसिंग राजपूत
माळेगाव पिंपरी येथे येथील कारवाई
सोयगाव:
पाचोरा कडून जरंडी कडे येणारा विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा माळेगाव पिंपरी येथे सोयगाव पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडल्याची घटना शुक्रवारी (दी.३) पहाटे चार वाजता घडली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजय वना कोळी यांच्या फिर्यादी वरुन दोघा विरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये हायवा सह पाच ब्रास वाळू अंदाजे किंमत २२ लक्ष तीस हजार रुपायांचा मुद्देमाल सोयगाव पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पाचोरा कडून जरंडी कडे अवैध वाळू वाहतूक करत असलेला हायवा क्र-एम एच-१८ ए सी – २२५५ हा येत असताना सोयगाव पोलिसांनी माळेगाव पिपंरी गावाजवळ सापळा रचून रंगेहाथ पकडला. यामध्ये पाच ब्रास वाळू किंमत तीस हजार रुपये आणि हायवा २२ लक्ष रुपये असा एकूण २२ लक्ष ३० हजार रुप्यांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या मार्गदर्शना खाली ए. एस. आय. ईसार मिर्झा,गजानन दांडगे, राजेंद्र सोनवणे,शांताराम सपकाळ, नारायण खोडे,संदीप सुसर,कुणाल जाधव, आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
फोटो ओळ :- सोयगाव – माळेगाव पिंपरी येथे सोयगाव पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडलेला हायवा ट्रक






