Home / Uncategorized / कुपटा घाटात टिप्पर आणि कारचा भीषण अपघात…

कुपटा घाटात टिप्पर आणि कारचा भीषण अपघात…

मानोरा प्रतिनिधी सुधीर ढगे 

मानोरा येथील दोन तरुण व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू

मानोरा: व्यापाराच्या निमित्ताने अमरावतीकडे प्रवास करणाऱ्या मानोरा येथील दोन तरुण व्यापाऱ्यांचा कार अपघातात जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हा भीषण अपघात ४ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कुपटा गावाजवळील घाटात झाला. या दुर्घटनेमुळे मानोरा शहरासह व्यापारी वर्गावर दुःखाचे सावट पसरले आहे. अपघातानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत फरार टिप्पर चालकाला अटक केली आहे.

सुफियान कादर लघा (वय २५) आणि इम्रान जरीब शेख (वय २९, दोघे रा. मानोरा) अशी अपघातात प्राण गमावलेल्या युवकांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुफियान कादर लघा हे मानोरा येथील रेडीमेड कपड्यांचे व्यावसायिक होते, तर त्यांचे मित्र इम्रान जरीब शेख हे जनरल स्टोअर्सचे व्यापारी होते. आपापल्या दुकानासाठी नवीन मालाची खरेदी करण्याच्या उद्देशाने हे दोघेही कारने अमरावतीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, कुपटा गावाजवळील घाट रस्त्यावरून जात असताना, समोरून येणाऱ्या एका भरधाव टिप्पर चालकाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भयानक होता की, टिप्परच्या धडकेमुळे कारचा समोरील भाग पूर्णपणे दाबला गेला. धडक एवढी जबरदस्त होती की, दोन्ही युवक कारच्या आतच गंभीर रित्या दबले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कारच्या चक्काचूर झालेल्या भागातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या टिप्पर चालक उत्तम तिरमाळे (उल्लासवाडी , पुसद ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार