देऊळगाव राजा | प्रतिनिधी
रथसप्तमीच्या पावन मुहूर्तावर परशुराम महिला मंडळाच्या वतीने महिला संघटन व समाज एकत्रीकरण या विषयावर देऊळगाव राजा येथील भक्त निवास येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध सामाजिक विषयांवर सकारात्मक व सखोल चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभाताई पुजारी मॅडम होत्या, तर उद्घाटन प्रतिभाताई जपे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात प्रतिक्षाताई कुलकर्णी यांनी मार्गदर्शनपर संबोधन केले.
या यशस्वी कार्यक्रमासाठी परशुराम महिला मंडळातील पल्लवीताई वाजपे, कीर्तीताई देशपांडे, रूपालीताई भैय्ये, रेणुकाताई गुंडे, सविताताई देवउपाध्ये, संपदाताई जपे, मेघाताई वैद्य, अनुराधाताई पाठक, अश्विनीताई टोणपे, दिपालीताई पुजारी, दिपालीताई शिराळकर, मिराताई पुजारी, कविताताई बिडकर, पौर्णिमाताई जोशी, मनीषा कुलकर्णी, ज्योतिताई सुरळीकर, अनिताताई जोशी, श्रेया मेव्हुणकर, अश्विनी देवउपाध्ये, अपर्णाताई भैय्ये यांचे मोलाचे योगदान लाभले.
यावेळी परिसरातील अनेक महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी हळदी-कुंकू समारंभही उत्साहात पार पडला.






