Home / Uncategorized / महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात महाराणा प्रतापसिंह यांची जयंती जल्लोषात साजरी…

महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात महाराणा प्रतापसिंह यांची जयंती जल्लोषात साजरी…

छत्रपती संभाजीनगर गोकुळसिंग राजपूत 

मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आरती, समाजबांधवांच्या भव्य सन्मान सोहळा 

भुसावळ;हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान, शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला.

समितीच्या अध्यक्षा सौ. जयश्री पाटील व उपाध्यक्षा सौ. प्रतीक्षा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय सावकारे व त्यांच्या सौभाग्यवती रजनीताई सावकारे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.

या जयंती उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांचा मोठ्या संख्येने झालेला सहभाग होय. महिलांनी उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेत जयंती सोहळ्याला वेगळीच उंची प्राप्त करून दिली. तसेच मुलींनी सादर केलेल्या चित्तथरारक शौर्य प्रात्यक्षिकांनी उपस्थित नागरिकांची मने जिंकली. त्यांच्या धाडसी आणि कौशल्यपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

कार्यक्रमास समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये सुरतसिंह पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान महाजन, दिलीपसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास पाटील, चोरवड-खेडीचे सरपंच भैया महाजन, दीपक भोळे, वराडसीमचे उपसरपंच विजय पाटील, खडका येथील पोलिस पाटील दारासिंह पाटील, जितू पाटील, जळगाव येथील करणी सेनेचे प्रवीणसिंह पाटील, संजना राजपूत, मुक्ताईनगर येथील विलास पाटील, वरणगाव येथील प्रवीणसिंह पाटील, मलकापूर येथील संदीप ठाकूर, बापू राणा, शिवचरण निकम, शिवसेना तालुकाध्यक्षा वर्षा तल्लारे, संग्रामसिंह पाटील, बी. एन. पाटील, आनंदा राजपूत यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी समाजसेवक राजू राजपूत यांच्या वतीने उपस्थित प्रत्येक समाजबांधवाला फेटा बांधून सन्मानित करण्यात आले. तसेच समाजातील प्रसिद्ध उद्योजक प्रशांत राजपूत यांनी सर्व समाजबांधवांसाठी थंड पेय व आईस्क्रीमचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, संदीप राणा, सारिका पाटील, जयश्री पाटील, प्रतीक्षा पाटील, मीना पाटील, कविता पाटील, वीरेंद्र पाटील व गणेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी उपस्थित सर्व मान्यवर, महिला भगिनी व समाजबांधवांचे आभार मानले.

महाराणा प्रताप यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाच्या विचारांना उजाळा देणारा हा भव्य जयंती सोहळा शहरवासियांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार