Home / Uncategorized / सोयगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रक्रियेत प्रणीकेत अनिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध…

सोयगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रक्रियेत प्रणीकेत अनिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध…

 

छत्रपती संभाजीनगर गोकुळसिंग राजपूत 

सोयगाव

तालुक्यातील बनोटी येथील प्रणीकेत अनिल पाटील यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विभागीय सहनिबंधक तथा अपिलीय प्राधिकरण यांनी वैध ठरविला आहे. या निर्णयामुळे प्रणिकेत पाटील यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असून सहकार क्षेत्रात या निर्णयाची मोठी चर्चा होत आहे.

 

सदर प्रकरणात प्रानिकेत अनिल पाटील यांच्या वतीने अॅड. बी. एन. पाटील तसेच अॅड. किरण मगर पाटील यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी निवडणूक कायदे व नियमांच्या आधारे युक्तिवाद सादर केल्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी उमेदवारी अर्ज वैध ठरविण्याचा निर्णय दिला.

सहकार प्रणेते व जिल्हा बँकेचे संस्थापक कै. रामचंद्र पाटील यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचे काम प्रणिकेत पाटील करत आहेत. सहकार ही केवळ आर्थिक चळवळ नसून ग्रामीण विकासाचा पाया आहे, हा संदेश रामचंद्र पाटील व रामदास पाटील बनोटीकर यांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला. पाडी, वाडी, वस्ती आणि खेडोपाडी सहकाराचे जाळे निर्माण करून शेतकरी, कष्टकरी व ग्रामीण समाजाला आर्थिक बळ देण्याचे ऐतिहासिक कार्य या नेत्यांनी केले आहे. याच सहकार परंपरेचा वारसा जपत जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे बळकटीकरण, शेतकरी हित आणि पारदर्शक सहकार व्यवस्थेसाठी कार्य करण्याचा निर्धार प्रणिकेत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

चौकट :.

ज्येष्ठ सहकार नेते कै. सहकारमहर्षी रामदास पाटील बनोटीकर यांचे नातू रामदास पाटील बनोटीकर हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक संचालक व तिसरे चेअरमन म्हणून कार्यरत होते. जिल्ह्यात सहकाराची मुळे रुजविणे, ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना सहकार चळवळीशी जोडणे आणि गावोगावी सहकाराचा विस्तार करणे यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांचे चिरंजीव प्रणीकेत अनिल पाटील यांच्या उमेदवारीचे सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर, सभासद आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत होत आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुक प्रक्रियेत उमेदवारी वैद्य ठरलेले प्रणीकेत अनिल पाटील  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार