Home / Uncategorized / मानोरा तालुक्यातील चित्र, ग्राहकांच्या लांबच लांब रांगा, गॅस सिलेंडरचा तुटवडा…

मानोरा तालुक्यातील चित्र, ग्राहकांच्या लांबच लांब रांगा, गॅस सिलेंडरचा तुटवडा…

मानोरा : प्रतिनिधी / किरण जैन.

मानोरा : मानोरा तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणू लागला आहे. गॅस सिलेंडरचे ट्रक वेळेवर न आल्याने स्थानिक गॅस एजन्सीकडे बुकिंग केलेल्या ग्राहकांना सिलिंडर मिळत नसल्यामुळे, ग्राहकांची फार मोठी गैरसोय होत आहे. परिणामी नागरिकांना सिलेंडर साठी गॅस एजन्सीच्या चकरा वारंवार उन्हातान्हात माराव्या लागत असून,सकाळपासूनच लांबच-लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गॅस एजन्सीकडे सिलेंडरची प्रतीक्षा यादी झपाट्याने वाढत असून अनेक ग्राहक वेटिंग वर आहेत गॅस सिलिंडरचा ट्रक वेळेवर पोहोचत नसल्यामुळे ग्राहकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सिलेंडर मिळविण्यासाठी ग्राहकांची धडपड सकाळपासून सुरू होत आहे, गॅस एजन्सीकडे खूपच गर्दी होताना दिसत आहे. अनेक ग्राहक ऑनलाईन बुकिंग करण्याची धडपड करत आहे. तरीपण ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रयत्न करत, असले तरी ऑनलाईन बुकिंग ची व्यवस्था मात्र बंद पडल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार