Home / Uncategorized / ४२ वेळा रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी; रक्तदाता प्रशांत घाणेकर यांचा वैजापूरात..

४२ वेळा रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी; रक्तदाता प्रशांत घाणेकर यांचा वैजापूरात..

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त शालिवाहन पतसंस्थेकडून सत्कार; ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’चा संदेश

वैजापूर, ता. १५ 

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. आपल्या रक्ताच्या काही थेंबांमुळे एखाद्याला नवजीवन मिळू शकते, ही भावना मनात जपत वैजापूर येथील प्रशांत घाणेकर यांनी अवघ्या ३८ वर्षांच्या जीवनात तब्बल ४२ वेळा रक्तदान करून समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याचा गौरव जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून दि .१५/६/२६ सोमवारी रोजी शालिवाहन पतसंस्था, शाखा वैजापूर यांच्या वतीने करण्यात आला.

शालिवाहन पतसंस्थेच्या वैजापूर शाखेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन किशोरसिंह चौहान, सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांच्या हस्ते प्रशांत घाणेकर यांना शाल, भेटवस्तू, प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना धोंडीरामसिंह राजपूत यांनी प्रशांत घाणेकर यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “रक्तदान ही केवळ सामाजिक सेवा नसून मानवतेप्रती असलेली निष्ठा आहे. घाणेकर यांनी सातत्याने रक्तदान करून अनेकांना जीवनदान देण्याचे महान कार्य केले आहे. त्यांचा आदर्श युवकांनी डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे.”

रक्तदानाबाबत समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी आणि अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदानामुळे कोणतीही शारीरिक हानी होत नसून ते आरोग्यासाठीही लाभदायक असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमास सल्लागार बाळासाहेब चव्हाण, राजेंद्र व्यवहारे, शाखाधिकारी सागर डघळे तसेच पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर येथील श्री सत्यसाई ब्लड सेंटरच्या पथकाने रक्त संकलनाचे काम केले.

प्रशांत घाणेकर यांच्या सत्कारामुळे उपस्थितांमध्ये रक्तदानाविषयी सकारात्मक भावना निर्माण झाली. समाजातील प्रत्येक सक्षम नागरिकाने नियमित रक्तदान करून गरजू रुग्णांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले

४२ वेळा रक्तदान करणारे प्रशांत घाणेकर यांचा सत्कार करताना चेअरमन किशोरसिंह चौहान, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत व अन्य मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार