जामनेर | प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
देवळगाव गुजरी येथील कृषी सेवा केंद्राचा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आधार; दर्जेदार कृषी निविष्ठांसह तज्ज्ञ मार्गदर्शनाची सुविधा
जामनेर तालुक्यातील देवळगाव गुजरी येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके योग्य दरात उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे कार्य जामनेर तालुक्यातील देवळगाव गुजरी येथील सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून सातत्याने करत आहे. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत अल्पदरात दर्जेदार कृषी साहित्य उपलब्ध करून देणारे हे केंद्र परिसरातील शेतकऱ्यांच्या विश्वासाचे ठिकाण बनले आहे.
सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्रामध्ये विविध कंपन्यांची प्रमाणित बियाणे, रासायनिक व सेंद्रिय खते, कीटकनाशके, बुरशीनाशके तसेच इतर कृषी उपयोगी साहित्य उपलब्ध असून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार योग्य मार्गदर्शनही केले जाते. बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी अडचणीत असताना त्यांना परवडणाऱ्या दरात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केंद्राच्या माध्यमातून केला जात आहे.
केंद्राचे संचालक राज रामराज ठाकूर यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना योग्य व दर्जेदार कृषी साहित्य मिळावे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. अल्पदरात बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध करून देतानाच पीक व्यवस्थापनाबाबत आवश्यक मार्गदर्शनही दिले जाते. शेतकऱ्यांनी खरेदीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य उत्पादनांची निवड करावी.”
देवळगाव गुजरीसह सावळदबारा परिसरातील डाभा, मोलखेडा, हिवरी, नांदा, तांडा, नादगाव, देव्हारी, पिंपळवाडी, चारमुठी, घाणेगाव, तोरणाळा आणि इतर गावांतील अनेक शेतकरी या केंद्राचा लाभ घेत आहेत. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या कृषी निविष्ठा एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होत आहे.
शेतकऱ्यांना दर्जेदार साहित्य, विश्वासार्ह सेवा आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास शेती उत्पादनात वाढ होऊन आर्थिक प्रगती साधता येते. याच उद्देशाने सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत असून परिसरातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे संचालक राज ठाकूर यांनी केले आहे.






