Home / Uncategorized / पंचवीस वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; नेकनूरमधील शेतरस्ता अखेर मोकळा…

पंचवीस वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; नेकनूरमधील शेतरस्ता अखेर मोकळा…

 

छत्रपती संभाजीनगर गोकुळसिंग राजपूत 

नेकनूर (ता. बीड) – गेल्या तब्बल २५ वर्षांपासून अतिक्रमणामुळे बंद झालेला काळे वस्ती-ब्रह्मनाथ मंदिर ते गोसावी वस्ती व शिंदे वस्ती परिसरातील शेतरस्ता अखेर महसूल प्रशासनाच्या कारवाईतून मोकळा करण्यात आला. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पार पडली.

हा रस्ता परिसरातील शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग होता. अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांना शेतीपर्यंत जाण्यासाठी मोठे वळसे घालावे लागत होते. तसेच पावसाळ्यात वाहतुकीच्या अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या प्रश्नाबाबत उपसरपंच सचिन शिंदे व ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत महसूल अभिलेखांची तपासणी करून संबंधित जागेची पाहणी केली. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी व उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमणे हटविण्यात आली.

रस्ता मोकळा झाल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत महसूल प्रशासनाचे आभार मानले. यावेळी उपसरपंच सचिन शिंदे, मंडळ अधिकारी पंडित नाईकवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

नेकनूरमधील हा शेतरस्ता खुला झाल्याने शेतमाल वाहतूक, विद्यार्थ्यांचा प्रवास आणि ग्रामीण दळणवळण अधिक सुलभ होणार असून, हा निर्णय गावाच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार