पोलीस घेत आहेत नातेवाईकांचा शोध महिला जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जोरदार ओरडत दगडे मारताना मिळुन आली होती
छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी : श्रीपत पवार
जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि.-२३/०१/२०२६ रोजी सकाळी ९.३० वा. सुमारास शिवाजीनगर गारखेडा परिसरातील जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मनोरुग्ण महिला हि जोरजोरात ओरडत नागरीकांना शीविगाळ करत दगडे मारताना च्या अवस्थेत मिळुन आलेली होती. महिला पोलीसांनी तीला पोलीस ठाणे जवाहरनगर येथे आणुन महिला पोलीस अंमलदारा मार्फत तिच्या राहत्या घराचा पत्ता वीचारला असता ती चावा घ्यायला लागली. सदर महिला ही भोळसर स्वभावाची असुन उडवा-उडवीचे उत्तरे देत होती.तसेच तिने तिच्या नातेवाईकांबाबत कुठलीही माहिती पोलिसांना दिली नाही, मा.पो.नि.सो. सचिन कुभार यांनी बेवारस मनोरुग्णासाठि काम करणाऱ्या सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेशी संपर्क साधला व सदर महिलेची माहिती दिली कि यात आपन काही मदत करु शकता का. माणुसकी वृद्ध सेवालयाचे सर्वा सर्वे सुमित पंडित व पुजा पंडित यांनी त्या महिलेच्या पुनर्वसनासाठी ची जबाबदारी स्वीकारली व पोलीसांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात
प्रभमोपचाकरिता दाखल केले. असता तीस मानसिक आजार असल्याने डॉ सांगितले व तीच्यावर उपचार सुरु केले.तरी तीला तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरत्या निवाऱ्यासाठी माणुसकी वृध्द सेवालय गावंदरी तांडा येथे पुनर्वसनासाठी पोलीसांनी दाखल केले.
या महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी झोन २, मशीन कल्याणकर सा.पो.आयुक्त,सचिन कुंभार पोलीस निरीक्षक जवाहर नगर,अतीश लोहकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक,मारुती खील्लारे पो. उप निरिक्षक,नाना फुंदे, राजेश चव्हाण पो.अ, रेवती थोरले महिला पोलिस,माणुसकी समुहाचे सुमित पंडित,संचालीका माणुसकी वृध्द सेवालय पुजा पंडित आदिनी मदतकार्य केले.
एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मनोरुग्ण महिलेला पुनर्वसनासाठी मदत केली…
सदर महिलेला नातेवाईक शोध घेत असल्याने जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेल्या महिला नामे नंदिनी ला एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मदत केली. ती मानसिक आजाराने पीडित आहेत. हा त्यांचा गुन्हा आहे का ? समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरीक आत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा ? प्रश्न ह्या एका महिलेचाच नाही, तर अजून कितीतरी असतील. ज्या अशाच अबोध आपल्या देहाला बेशुद्ध मिरवत असतील समाजातील वाईट नजरे सामोर मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का? समाजाच दायित्व काहीच नाही का ? जीवनात संकट सांगून येत नसतात. आपण आपल्या मर्यादा जर खरच वाढवल्या आणि मदतीचा हात सामाजिक संस्थाना लावला, जे अशा स्वरूपाचं काम करण्यास उभे होत आहेत. तेव्हा खऱ्या अर्थाने मनोरुग्णाचा मानसिकतेत स्थिरता येईल. आणि समाजाची खरी मानसिक विकृत वृत्ती नष्ट होईल
———श्री सचिन कुंभार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जवाहरनगर,






