छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
कन्नड/वैजापूर ता.३१
“जगाचे कधी काळी कल्याण व्हायचे असेल तर ते सेवेत असणारे शिक्षक व सेवा निवृत्त असणारे शिक्षक यांच्या अध्ययन-अध्यापन व समाजोपयोगी कार्यातूनच
शक्य आहे”,असे प्रतिपादन कन्नड चे माजी आमदार उदयसिंह राजपूत यांनी कन्नड येथील सेवा निवृत्त शिक्षक वयाची८६वर्षे पूर्ण करणारे कन्हैयालाल अहिरराव गुरुजी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शुक्रवार(ता,३१)रोजी केले.ते पुढे म्हणाले की,”शिक्षकांचे संस्कार, हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला सुयोग्य असा आकार देऊन त्यांचे उज्वल भवितव्य घडवितात,त्यापैकी गुरुवर्य श्रीअहिरराव गुरुजीआहेत.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष वसंत सबनीस होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमान नगराध्यक्ष जावेद शेठ.नगरसेवक बंटी सुरे,कन्नड पेन्शनर्स श्री कुंभकर्ण, संभाजीनगर पेन्शनर्स असोसिएशनचे सर्वश्री डॉ.देशमुख,श्री. अमृतसर, श्री घुगे,नंदुरबारचे पेन्शनर्स सचिवदिलीपपाटील,शिरपूरचे
लेखक व व्याख्याते मोहनदास भामरे, खुलताबाद च्या अध्यक्ष श्रीमती घोडके ताई,सिल्लोड चे श्री देशमुख, ,वैजापूर चे अध्यक्ष ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत.सेवानिवृत्त ८६वर्षीय शिक्षक कन्हैयालाल अहिरराव यांच्या वाढदिवसानिमित्त कन्नड पेन्शनर्स असोसिएशनचे श्री परदेशी दादा,
सरदारसिंह परदेशी, भरतसिंह राजपूत, श्री. घोडके, श्री.सोनवणे, श्री.सूर्यवंशी,व सदस्यांनी हा अभिष्टचिंतन सोहळा व पेन्शनर्स आनंद मेळावा आयोजित केला होता.मोहनदास भामरे यांनी उतरत्या जीवनात आनंदी कसे जगावे या विषयी मार्गदर्शन केले .दिलीप पाटील यांनी पेन्शनर्स जीवन जगताना सामाजिक बांधीलकी जपून आनंदी रहावे असे संबोधले.तर वसंत सबनीस यांचे ही समयोचि
[7/31, 6:02 PM] Dhondiramsingh Rajput वैजापूर: वसंत सबनीस यांचे ही समयोचित भाषण झाले.श्री. परदेशी दादा व कन्हैयालाल अहिरराव यांनी
उपस्थितांचे आभार मानले.सूत्र संचलन वैजापूरचे ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले तर आभार संघटनेचे सचिव घोडके यांनी मानले.(फोटो कॅप्शन-मा.आमदार उदयसिंह राजपूत पेन्शनर्सना संबोधित करताना शेजारी वसंतराव सबनीस, धोंडीराम राजपूत, कन्हैयालाल अहिरराव,मोहनदास भामरे व ईतर)






