Home / Uncategorized / सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राहुल म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त राजपूत व देशमुख परिवाराकडून भव्य सत्कार…

सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राहुल म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त राजपूत व देशमुख परिवाराकडून भव्य सत्कार…

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन व्यक्त केला सन्मान; सामाजिक, वैद्यकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

बुलढाणा येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ तथा एम.डी. मेडिसिन डॉ. राहुल म्हेत्रे बुलढाणा यांच्या वाढदिवसानिमित्त राजपूत व देशमुख परिवाराच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. समाजसेवा, रुग्णसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी उपसंपादक गोकुळसिंग राजपूत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष छत्रपती संभाजी नगर व पत्रकार दिलीप देशमुख जिल्हा कार्याध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज यांनी डॉ. राहुल म्हेत्रे यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ प्रदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रुग्णांप्रती असलेली त्यांची सेवाभावी वृत्ती, वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य आणि समाजहिताची जपलेली बांधिलकी याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.

डॉ. राहुल म्हेत्रे यांनी आपल्या ज्ञान, अनुभव आणि कर्तव्यदक्षतेच्या बळावर बुलढाणा जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली आहे. अनेक रुग्णांना योग्य उपचार व मार्गदर्शन देऊन त्यांनी जनमानसात विश्वासाचे स्थान मिळवले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, यश आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या सत्कार समारंभास डेंटल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. शरद जुमडे, उपजिल्हाप्रमुख केवलसिंग ठाकूर, उपजिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. राहुल म्हेत्रे यांच्या सामाजिक बांधिलकीचे व रुग्णसेवेतील योगदानाचे विशेष कौतुक करत त्यांना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वाढदिवसानिमित्त आयोजित या सत्कार सोहळ्यामुळे डॉ. राहुल म्हेत्रे यांच्याबद्दल असलेला आदर आणि प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार