Home / Uncategorized / गोवंश हत्या प्रकरणी कारवाईची मागणी; विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचे निवेदन..

गोवंश हत्या प्रकरणी कारवाईची मागणी; विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचे निवेदन..

   मानोरा प्रतिनिधी सुधीर ढगे

मानोरा तालुक्यातील कुपटा येथे ३० मे २०२६ रोजी गोवंशाची अवैध हत्या करून त्याचे अवशेष फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मानोरा तालुक्यासह वाशिम जिल्ह्यात गोवंश तस्करी, अवैध कत्तल आणि गोमांस वाहतुकीच्या घटना वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणातील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल, मानोरा प्रखंडच्या वतीने ४ जून रोजी मानोरा पोलीस स्टेशन येथे ठाणेदारांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान, या घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार