मंगरूळपीर : सुधीर ढगे
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद मंगरूळपीरच्या वतीने दि. 4 रोजी शहरात प्लास्टिक बंदी मोहीम व जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या मोहिमेदरम्यान प्रतिबंधित प्लास्टिक वस्तूंची तपासणी करण्यात आली तसेच नागरिक व व्यापाऱ्यांना पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागांना भेटी देत प्लास्टिकमुक्त शहरासाठी जनजागृती केली. मोहिमेदरम्यान प्लास्टिक पिशव्या व इतर प्रतिबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
स्वच्छ सर्वेक्षण 2026 आणि ‘माझी वसुंधरा 7.0’ अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून ‘प्लास्टिकमुक्त मंगरूळपीर’ या संकल्पनेला अधिक बळ मिळत आहे.
या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक गजानन तिडके, शहर समन्वयक कु. चव्हाण, वार्ड सुपरवायझर तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या सक्रिय सहभागातून नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
या मोहिमेदरम्यान स्वच्छता निरीक्षक गजानन तिडके, शहर समन्वयक कु. चव्हाण, वार्ड सुपरवायझर तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या सहभागातून नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली व पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.






