छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी – श्रीपत पवार
पैठण : कमला एकादशी निमित्त पैठण येथे हजारो भाविकांनी संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. टाळ-मृदंगाच्या गजरात तसेच “संत एकनाथ महाराज की जय”, “भानुदास एकनाथ”च्या जयघोषात अनेक दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्या.
भाविकांनी पवित्र गोदावरी नदीत स्नान करून संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी महिला भक्तांनी मंदिर परिसरात फुगडी खेळत भक्तिमय वातावरणात आनंद साजरा केला.
कमला एकादशी निमित्त आलेल्या भाविकांसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रम शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.





