Home / Uncategorized / वन विभागाची चिखली तालुक्यात धडक कारवाई दोन लाखाचा मुद्देमाल जप्त….

वन विभागाची चिखली तालुक्यात धडक कारवाई दोन लाखाचा मुद्देमाल जप्त….

लोक महाराष्ट्र न्यूज

 आज दिनांक 28/05/2026 रोजी गोपनीय माहितीच्या अनुषंगाने मेरा बुद्रुक शिवारात अवैधरित्या निम व इतर अडजात प्रजातीचे लाकूड साठा असल्याची माहिती वन विभागाला मिळाली त्यावरून माननीय उप वनसंरक्षण बुलढाणा वन विभाग बुलढाणा श्री जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण दोन लाख किमतीचा मुद्देमाल साठवून ठेवलेला निम व इतर प्रजातीच्या लाकडाचा साठा वनविभागाने केला जप्त. सदर कार्यवाही मध्ये अंचरवाडी बीटचे वनरक्षक गजानन माणिकराव पोटे यांनी जागेवर जाऊन सदर लाकडे जप्त केली आहेत.मौजे मेरा बुद्रुक ग.न 517 शेतकऱ्याचे नाव संजय खरात राहणार -शिंदी यांच्या पडीत जमिनावर आरामशीन मालक नरेंद्र पाटील राहणार – साखरखेर्डा यांनी हा लाकूड साठा विनापरवाना विना पास कोणतीही परवानगी न घेता दडून ठेवलेला होता. वन विभागाकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई ही वनरक्षक गजानन माणिकराव पोटे अंचरवाडी बिट वन सेवक ऋषिकेश तुपकर यांनी पार पाडली सदर कारवाई मध्ये मार्गदर्शन माननीय सहाय्यक व संरक्षक प्रादेशिक व कँपा बुलढाणा , श्री वैभव काकडे साहेब श्री. वनपरिक्षेत्र अधिकारी बुलढाणा सुनील वाकोडे साहेब सदर प्रकरणाचा तपास वनपाल श्री प्रदीप प्रकाश मुंढे हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार