मानोरा प्रतिनिधी: विनोद चव्हाण
तांड्यावर पारंपारिक होळी साजरी
मानोऱ्यात लेंगी नृत्यांने रंगली होळी
मानोरा,; होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मानोरा तालुक्यातील बंजारा तांडा. वाडी. वस्त्यावर सध्या लेगी गीतांचे सुरेल निनाद घुमत आहे मागील आठ दिवसापासून बंजारा समाजा बांधव पारंपारिक पद्धतीने होली उस्तव साजरा करत असून तांड्यावर सायंकाळ होताच डफलीच्या तालावर नृत्य गायनाची मैफल रंगू लागते तांडा संस्कृतीची ओळख असलेली लेंगी गीते बंजारा समाजाच्या सांस्कृतिक वारसा चा अविभाज्य भाग आहे रंगीबेरंगी पारंपारिक वेशभूषा महिलांचे घुंगराणी सजलेले पोशाख पुरुषांचे पारंपारिक पेहराव आणि डफडीच्या ठेक्यावर सादर होणारे सामूहिक नृत्य यामुळे संपूर्ण वातावरण उत्साह माय झाले आहे शहरातील नाईक नगर तीर्थक्षेत्र पोहरादेवी उमरी खुर्द आसोला खुर्द फुलउमरी कारपा शेंदुर्जना आढाव सेवादास नगर सोमनाथ नगर वाईगोळ सिंगडोह बांधव दररोज एकत्र येऊन लेंगी गीतांचा आपल्या संत महापुरुषांच्या जीवनकार्याचा गौरव करत आहे संत सेवालाल महाराज राज्यांचे दिवंगत माजी महानायक वसंतराव नाईक संत रामराव महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित रचना सादर केला जातात समाज बांधव एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा देतात संदेश देतात लेंगी गीतांचे सूर आणि रंग उत्सवाची लगबग पाहता मानोरा परिसरत होळीचा सण थाटात साजरा होत असल्याचे दिसून येत आहे






