छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार
___________________________________
पैठण : उल्लेखनीय कार्याबद्दल गजानन आवारे यांचा सन्मान
ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्न, जनसामान्यांच्या समस्या आणि विकासात्मक विषयांवर सातत्याने प्रभावी वृत्तांकन करणारे पैठण येथील ज्येष्ठ पत्रकार गजानन आवारे पाटील यांना शांतीब्रम्ह श्रीसंत एकनाथ महाराज सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण व त्रिपूर्ती सेवा गौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी ह.भ.प. श्री.महंत प्रमोद महाराज जगताप, संस्थानाधिपती ह.भ.प. श्रीगुरु रावसाहेब महाराज गोसावी तसेच ह.भ.प. नाथ वंशज पुष्कर महाराज गोसावी यांच्या हस्ते गजानन आवारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पत्रकारिता क्षेत्रात समाजाभिमुख व निर्भीड वृत्तांकन करून गजानन आवारे यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे मान्यवरांनी सांगितले.
या सोहळ्यास श्रीमद जगद्गुरू सच्छिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती शंकराचार्य महाराज (संकेश्वर पीठ, कर्नाटक) यांचे उत्तराधिकारी जगद्गुरू शंकरभारती महास्वामी महाराज, ह.भ.प. श्री.महंत प्रमोद महाराज जगताप, ह.भ.प. श्री.अमृताश्रम स्वामी महाराज (बीड), संस्थानाधिपती ह.भ.प. श्रीगुरु रावसाहेब महाराज गोसावी, ह.भ.प. नाथ वंशज पुष्कर महाराज गोसावी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार सोहळा ह.भ.प. श्री.रावसाहेब महाराज गोसावी, संस्थानाधिपती श्रीनाथ संस्थान श्रीक्षेत्र पैठण यांच्या मार्गदर्शनाखाली बाहेरील नाथ मंदिर, श्रीक्षेत्र पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला.






