Home / Uncategorized / शहराच्या पाणी पुरवठा कामासाठी 18 कोटीचा निधी द्या -उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांना नगराध्यक्षा माधुरीताई शिपणे यांचे निवेदन….

शहराच्या पाणी पुरवठा कामासाठी 18 कोटीचा निधी द्या -उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांना नगराध्यक्षा माधुरीताई शिपणे यांचे निवेदन….

देऊळगाव राजा : मुन्ना ठाकूर

शासनाच्या “नगरोत्थान” योजनेअंतर्गत प्रगतीत असलेले देऊळगाव राजा शहराच्या पाणी पुरवठा कामासाठी रु. 18 कोटी निधी उपलब्ध करुन ‘देण्यात यावा अशी मागणी नगराध्यक्षा माधुरी शिपणे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदनातून केल केली आहे,

देऊळगांव राजा शहरासाठी शासनाच्या नगरोत्थान योजने अंतर्गत पाणी पुरवठा कामासाठी रु. 34.08 कोटीची योजना सन 2023 मध्ये मंजूर झालेली आहे. योजना कार्यान्वीत करणेसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होवून योजनेची वितरण व्यवस्था मुख्य जलकुभ (ES२) व जलशुध्दीकरण केंद्र (WTP) ही कामे अंतिम टप्यात आहेत. परंतू (WTP) तथा योजनेचे अनुषंगिक कामे पूर्ण करणे बाकी आहेत. त्यामुळे शहराला आद्यापपर्यत नवीन योजनेद्वारे पाणी पुरवठा होत नाही. सद्यस्थितीत कंत्राटदाराने निधी अभावी कामे बंद केलेली आहेत.आतापर्यत 50 टक्के निधी खर्च करूनही योजनेचा लाभ शहरवासियांना होत नाही. योजनेची उर्वरीत कामे पूर्ण करणेसाठी रु.18.00 कोटीची आवश्यकता आहेसद्यस्थितीत शहराला जुन्या योजनद्वारे 15 ते 18 दिवसाआड पाणी मिळत आहे. जनतेची मागणी किमान तीन दिवसाआड पाणी द्यावी अशी आहे. डिसेंबर 2025 च्या नगर परिषदेच्या निवडणुकीत मा. दादांनी शहरवासीयासाठी 1 महिन्यात किमान 8 दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन दिलेले आहे व शहरवासियांनी विश्वास ठेवून नगराध्यक्ष व नगरसेवकांना बहुमताने निवडूण दिलेले आहे. निवडणुकीची आश्वासनपुर्तीसाठी व जनतेला किमान तीन दिवसाआड पाणी देणेसाठी देऊळगांव राजा नगरपरिषदेला “नगरोत्थान” योजनेअंतर्गत प्रगतीत असलेला पाणी पुरवठा कामांसाठी उर्वरित रु. 18.00 कोटीच्या निधीची तातडीने उपलब्धता करून देण्याची कार्यवाही व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार