Home / Uncategorized / पूर्वाश्रमीच्या महारांनो आणि आजच्या धर्मांतरित नवबौद्धांना आता तरी तट गट पक्ष बाजूला सारुन एक संघ होऊन सावध व्हा…

पूर्वाश्रमीच्या महारांनो आणि आजच्या धर्मांतरित नवबौद्धांना आता तरी तट गट पक्ष बाजूला सारुन एक संघ होऊन सावध व्हा…

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी :- गोकुळ सिंग राजपूत

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय देणारे व सामाजिक विषमता निर्माण करणारे “आपले दात आणि आपलेच ओठ” असे भारताचे माजी सरन्यायाधीश बी आर गवई यांचा सर्वप्रथम मी जागरूक नागरिक म्हणून जाहीर निषेध करतो

________________________

मातंग समाजाच्या आडून भाजपा आणि आरएसएसने तुमच्या विरोधात टाकला मोठा डाव 

____________________________

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण एकट्या मातंग समाजाचे ऐकून नव्हे तर भाजपा आणि आरएसएसचे ऐकून न्यायमूर्ती अनंत बदर समितीने बौद्ध धर्मातील महार समाजावरच अन्याय केल्याचे वर्तमानपत्रात व सोशल मीडियाच्या माध्यमातून समजले.

_________________

यासाठी आजच बौद्ध धर्मातील महार नवोदय बौद्ध बांधवांनो सावधान सावध रहा

________________________

(सत्य आणि वास्तव)

मनुवाद्यांच्या गुलामगिरीत गाव पुसा बाहेर राहणारा व हजारो वर्षे बंदीत असलेला अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रामुख्याने मांग मातंग महार चर्मकार हा समाज होता. 

मेलेली जनावराची कातडी काढणे मेलेली जनावराची मास खाणे गळ्यात मडकी पाठीमागे झाडू कोणत्याही प्रकारचं शिक्षण नाही बोलण्याचा अधिकार नाही अशा प्रकारचे बंधने लाभलेला हा समाज खऱ्या अर्थाने 14 एप्रिल 1891 संकपाळ कुळात जन्मलेला या समाजातला दीपस्तंभ कोट्यवधी समाजाचा नवप्रकाशाचा दिवा रामजी संकपाळ (सुभेदार) यांच्या पोटी जन्माला आलेले 14 वे रत्न भीमराव रामजी संकपाळ अर्थात भीमराव रामजी आंबेडकर यांच्यामुळे आज खऱ्या अर्थाने स्वाभिमानानं, ताठ मानेने, अभिमानाने माणूस म्हणून जगता येत आहे. आणि त्याच समाजाला आज खऱ्या अर्थाने या देशातली मनुवादी समाज व्यवस्था या देशाची विषारी आरएसएस ही संघटना या देशातली भाजपा या देशातली सनातनी समाज व्यवस्था स्वतःला हिंदू समाजणारे गोळवलराचे अनुयायी हे आज पूर्वाश्रमीच्या महारांना म्हणजेच आजच्या धर्मांतरित नवबौद्धांना, बौद्धांना टारगेट करून त्यांना संपवण्याचं आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं मौल्यवान संविधान मिटवण्याचं त्यांनी छडयंत्र रचलेलं आहे. त्यासाठी माझ्या बौद्ध समाज बांधवांनो आजच सावध व्हा, महारांनो सावध व्हा आणि ह्या मनुवादी लोकांचा गनिमी कावा ओळखा नाहीतर उद्याचा दिवस, उद्याच्या पिढ्यांचं भविष्य, तुमच्या आयुष्यात पूर्वीप्रमाणेच आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या हे आज स्पष्टपणे चित्र दिसतंय.

बौद्ध विरुद्ध मातंग असा संघर्ष या राज्यात सुरू केलेला आहे.

या अगोदर ओबीसी विरुद्ध मराठा असा उभा संघर्ष या महाराष्ट्राने पाहिला व आज रोजी सुद्धा तो संघर्ष चालूच आहे.

कारण जाती-जातीत, समाजा समाजात, धर्माधर्मात वाद निर्माण करून जातीय-तेढ निर्माण करून इथली ही मनुवादी समाज व्यवस्था पुन्हा मनुचे राज्य, मनूची व्यवस्था आणण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे तो मोठ्या प्रमाणात सुद्धा त्यांनी यशस्वी केलेला आहे.

या देशांमध्ये हे विषारी रोपट हे विषारी विचार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जाळून भस्मसात केले तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमचे अधिकार, तुमचे हक्क, तुम्हाला स्वाभिमान, तुम्हाला ताट मानेने जगण्याचा अधिकार मिळाला.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकशाही अस्तित्वात आणली, संविधान लिहिलं आणि या देशाची राजेशाही पद्धत संपवली. या देशातल्या शेवटच्या घटकाला मताचा अधिकार दिला त्या मताच्या अधिकारामधून या देशाचा राजा निवडण्याचा त्याच्या मतांमधून त्याला अधिकार मिळाला. परंतु आज तोच अधिकार हिसकण्याचं व हिरावून घेण्याचं पुन्हा कट कारस्थान या देशांमध्ये रचल्या जात आहे हे लक्षात घ्या माझ्या बांधवांनो.

या देशात सन 2014 पासून जेव्हा भाजपचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले तेव्हापासून या भाजपाच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी सरकारने देशातील निद्रावस्थेत असलेल्या सनातनी मनुवादी व्यवस्थेला जागृत करुन तुमच्या विरुद्ध उभे केले आणि त्यांच्याच माध्यमातून देशात मोठ्या प्रमाणात दलितांवर म्हणजेच इथला आदीवाशी,इथला भटका समाज, इथला पूर्वाश्रमीचा महार आजचा बौद्ध, नवबौद्ध, इथला मातंग, मांग, चांभार अशा जातसमुहांवर हल्ले होत असून त्यांना बहिष्कृत केल्या जात आहे. ही जातीयवादी प्रक्रिया सुरू केलेली आहे हे आजचे वास्तव चित्र आहे माझ्या समाज बांधवांनो.

स्वतःच्या स्वार्थासाठी , छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे, अशा वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावे सामाजिक संघटना, वेगवेगळे पक्ष काढून हे स्वार्थ साधू संधी साधू समाजाला गिळकृत करणारे पुढारी, नेते स्वतःला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी समजणारे वेगवेगळ्या पक्षाचे राष्ट्रीय नेते, हे मात्र एसीत बसून स्टेटमेंट देतात मात्र प्रत्यक्ष कोणतेही प्रकारचं सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील असत नाही. मात्र काही चळवळीत काम करणारे समाजासाठी झटणारे नेते आहेत पुढारी आहेत त्यांचं कौतुक केलेच पाहिजेत मात्र त्यांच्याही आवाजाकडे आपले नेते पुढारी लक्ष देत नाही आणि इथल्या या मनुवादी समाज व्यवस्थेला धारेवर धरत नाही त्याचमुळे समाजावर सातत्याने अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता अनुसूचित जाती या प्रवर्गाचे अबकड उपवर्गीकरण करून बौद्ध आणि मातंग असा वाद या मनुवादी भाजपा सरकारने केलेला दिसून येत आहे. आणि त्यालाच खत पाणी घालण्याचे काम सर्वप्रथम या देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर होते ते माजी सरन्यायाधीश बी आर गवई यांनीच खऱ्या अर्थाने अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये फूट पाडण्याचे आणि वादविवाद करण्याचे काम त्यांनी दिलेल्या निर्णयामुळेच झाले आहे. सर्वप्रथम मी माजी सरन्यायाधीश बी आर गवई त्यांच्या निर्णयाचा मी जाहीर निषेध करतो.

भारतीय जनता पक्षामध्ये खऱ्या अर्थाने म्हणजेच आरएसएस मध्ये बौद्ध समाजाचे नेते तर नाहीच मात्र स्वतःला लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे, आद्य

क्रांतिकारक लहुजी वस्ताद यांच्या विचाराला पुढे घेऊन जाणारे मात्र पूर्णपणे या समतावादी बहुजनवादी विचाराला आरएसएसच्या दावणीला बांधणारे मातंग समाजातील नेते, आमदार त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्णपणे आज गाव पुसा बाहेर राहणारा आमचा मातंग समाज यांचे पूर्णपणे सामाजिक नुकसान करण्याचे काम सुरू केले आहे आणि ते यशस्वी सुद्धा होत आहे त्यांचाही मी जाहीर निषेध करतो.

मला इथल्या मातंग समाज बांधवांना विचारायचं आहे की, जेव्हा जेव्हा तुमच्यावर या राज्यामध्ये अमानुष अत्याचार झाले, महिलांवर बलात्कार झालेत इज्जती लुटल्या तेव्हा या भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारे जे काही आमदार आहेत जे काही नेते आहेत की कधी तुमच्यासाठी धावून आलेत का? कधी सरकारला यांनी जॉब विचारला? कधी ते रस्त्यावर उतरून त्यांनी सरकारचा निषेध केला का? याचे उत्तर मात्र पूर्णपणे नाही येईल. त्यांनी फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ साधून तुम्हाला वाळीत टाकण्याचे काम या मातंग समाजाच्या लबाड नेत्यांनी केले ते दिसून येते का? भोळा भाबडा आमचा मातंग समाज मात्र आज रोजी त्यांच्या आश्वासनाला त्यांच्या बेगडी प्रेमाला बळी पडताना दिसत आहेत स्वतःच्या पायावर दगड पाडून घेताना दिसत आहे.

असो आज मातंग समाज खऱ्या अर्थाने या भाजपामध्ये काम करणाऱ्या मातंग समाजाच्या नेत्यांमुळे आज उपवर्गीकरणाच्या नावाखाली भटकवल्या जात आहे. हे मातंग समाजाने ओळखले पाहिजेत. मात्र तो समाज आज ओळखायला तयार नाही त्यांनी फक्त बौद्धांविरुद्ध संघर्ष उभा केला आहे परंतु बौद्ध समाज सुद्धा तेवढा जागृत आहे की, मातंग समाज आज जरी भाजपा आरएसएसच्या लोकांचे ऐकून आज रस्त्यावर उतरून तो स्वतःचा वेगळे आरक्षण मागत असेल तर त्याची ती बालिश बुद्धी आहे असे बौद्ध समाज आज बोलत आहे.

परंतु या मातंग समाजाचे कोणते प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून बौद्ध समाज खऱ्या अर्थाने या उप वर्गीकरणाच्या विरोधात उतरलेला आहे मातंग समाजाच्या विरोधात नाही हे लक्षात घ्या माझ्या मातंग समाज बांधवांनो. आणि ही खेळी पूर्णपणे भाजपाने, आरएसएसने खेळी खेळली असून त्यांचा हा डाव बौद्ध समाज कदापि ही यशस्वी होऊ देणार नाही हे तेवढेच मात्र खरे आहे.

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज खऱ्या अर्थाने आजच्या ह्या मनुवादी समाज व्यवस्थेला मुठमाती देत आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभ्या आयुष्यात समाजासाठी उभा संघर्ष केला. समाजाला न्याय हक्क संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिले. स्वाभिमानाने अभिमानाने जगण्याचा अधिकार दिला. पूर्वीचा गावकुसाबाहेर राहणारा मनुवाद्यांच्या हजारो वर्ष गुलामगिरीच्या साखळदंडात बंदिस्त असणारा माझा महार मांग मातंग बौद्ध चर्मकार म्हणजेच माझा अनुसुचित जाती समूहातील इतर उपेक्षित हा समाज आज स्वाभिमानाने जीवन जगेल असे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेले होते. आणि ते त्यांनी करून सुद्धा दाखवले होते परंतु आज मी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर या अनुसूचित जाती समूहामध्ये उभी फूट पडताना आपण पाहत आहोत. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या सामाजिक संघटना बाबासाहेबांच्या नावाने या राज्यामध्ये देशांमध्ये निर्माण झाल्या. कोणताच नेता कुणाचे ऐकण्याची तयारी दाखवत नाही. जो तो आपलं पाल मांडून बाबासाहेबांचे नाव घेऊन फक्त पोळी भाजण्याचे काम तो करत आहे आणि त्यामुळेच इथली मनुवादी समाज व्यवस्था त्याचा फायदा घेऊन समाजावर अन्याय अत्याचार करत आहे परंतु या पुढार्‍यांना मात्र काहीही घेणे देणे दिसत नाही.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या असलेल्या पक्षात यांच्या विचाराचे असलेले नेते यांच्या विचाराचे असलेले कार्यकर्ते यांना मात्र फोडण्याचे काम भाजप असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल यांनी केलेला आहे.

या महाराष्ट्रात जर पाहिले तर आज घडीला भारतीय जनता पक्षाच्या दावणीला मोठ्या प्रमाणात मातंग समाजाचे नेते बांधलेले आहे. त्याचबरोबर बौद्ध समाजाचे सुद्धा नेते चर्मकार समाजाचे सुद्धा नेते बांधलेले दिसून येतात त्यांचे अनुकरण करताना दिसतात. या पक्षांकडून कोणी आमदार, खासदार मंत्री झालेले आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या दावणीला सुद्धा बौद्ध समाजातील नेते बांधलेले असून कोणी खासदार आमदार मंत्री झालेले आहे. कोणी शिवसेनेच्या दावणीला बांधून आमदार खासदार मंत्री झालेले आहे. परंतु महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा असलेला पक्ष बाबासाहेबांचे वारस नातू श्रद्धेय ॲड प्रकाश यशवंतराव आंबेडकर, भीमराव यशवंतराव आंबेडकर, सरसेनानी आनंदराज यशवंतराव आंबेडकर या बाबासाहेबांच्या नातवाने मात्र या देशातल्या तमाम बहुजन समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाला त्याचे न्याय अधिकार त्याचे हक्क व त्यावर होणारे अत्याचार याबाबत देशभर त्यांनी परिसंवाद मोठमोठे मिळावे आयोजित करून एक परिवर्तन करण्याचा त्यानी प्रयत्न सुरू केलेला आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवांना बाबासाहेबांचे अनुयायी समाजणा-या भाजपा पक्षात काम करणाऱ्या शिवसेनेत काम करणाऱ्या नेत्यांनी मात्र त्यांना टार्गेट करून त्यांनाच संपवण्याचे कटकारस्थान सुरू केलेला आहे

पूर्वीचा मातंग, मांग, या माझ्या समाजात जन्माला आलेल्या क्रांतीकारकांनी कधीच स्वतःला वेगळे समजलं नाही कधीच स्वतःला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून त्यांनी जातीवाद्यांच्या विचाराला खतपाणी घातले नाही. मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळावे म्हणून अनेक मातंग समाजातील क्रांतिकारक यांनी जीवाचे बलिदान दिले ते शहीद झाले शहीद पोचीराम कांबळे असेल शहीद गौतम वाघमारे असेल अशा अनेक बाबा साहेब आंबेडकरांच्या विचारासाठी व नावासाठी जीवाचे बलिदान करणारे या क्रांतिकारकांनी शहिदांनी कधीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला तिरांजली दिली नाही.

आजही काही मातंग समाजातले नेते हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने फुले शाहूंच्या विचाराने आज पुढे गेलेले आहेत. लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी तर शेवटी शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरुस्थानी मानून त्यांच्या विचाराला पुढे घेऊन जाण्याचा त्यांनी संकल्प केलेला होता आणि त्यामध्ये ते म्हणाले होते की “जग बदल घालुनी घावं मज सांगून गेले भीमराव”बाबासाहेबांचे विचार या देशाला या समाजाला तारू शकतात दिशा देऊ शकतात वाचू शकतात स्वाभिमान देऊ शकतात आधार देऊ शकतात अशा प्रकारे लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम केले आहे. त्यांनी कधीच मातंग आणि महार हे दोन्ही समाज वेगळे आहे असे म्हटलेच नाही. परंतु आजचा तथाकथित भाजपामध्ये काम करणारा मातंग समाजाचा नेता हा मात्र भाजपाचे ऐकून अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याचा घाट घालताना दिसत आहे तो मात्र त्यांच्या पत्थ्यावर न पडणारा आहे आज जरी सरकार अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करून अनुसूचित जाती या समूहामध्ये फूट पाडण्याचे काम करत असेल परंतु बौद्ध समाज म्हणजेच पूर्वीचा महार हा शिकलेला सवरलेला आहे हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा समाज कदापिही अनुसूचित जातीचे उप वर्गीकरण होऊ देणार नाही कारण यात माझ्या मातंग समाज बांधवांचे मोठे नुकसान आहे. म्हणूनच बौद्ध समाज या आरक्षण उपवर्गीकरणाच्या पूर्णपणे विरोधात उतरलेल्या असून मातंग समाजाचे होत असलेले सामाजिक नुकसान थांबवण्याचा पुरेपूर बौद्ध समाज प्रयत्न करत आहे.

सरकारला हेही माहिती आहे की, बौद्ध समाज हा आक्रमक समाज आहे. त्याचबरोबर मातंग समाज सुद्धा आक्रमक समाज आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार हे अनुसूचित जातीचे उप वर्गीकरण करणार नाही फक्त सरकार मातंग आणि बौद्ध समाजामध्ये म्हणजेच मांग महार जातीत तेढ निर्माण करून दोन्ही समाजाला वेगळे करण्याचा ते प्रयत्न करत आहे. मात्र ते प्रयत्न त्यांचे सफल होणार नाही त्यासाठी बौद्ध समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे.

मातंग समाज बांधवांनी बौद्ध समाजाबाबत पसरवलेला द्वेष हा कृपया त्यांनी थांबवावा. गैरसमज करू नये कारण बौद्ध समाज हा मातंग समाजाच्या विरोधात नाही, असणार नाही भाऊ भाऊ म्हणूनच दोन्ही समाज एकत्र असतात अन्याय अत्याचाराला दोन्ही समाज पुढे धावून जातो सरकारला जॉब विचारला जातो तुम्ही वेगळे ताट घेण्याचा जर प्रयत्न आज रोजी करत असाल तर सरकार तुमच्या ताटात नक्कीच माती टाकेल हे तेवढेच मात्र खरे आहे. परंतु आम्हा बौद्ध बांधवांना तुमच्या ताटात या मनुवादी समाज व्यवस्थेला माती टाकू द्यायची नाही तुम्हाला ताट मानेने स्वाभिमानाने जीवन जगता यावं आणि सुखाची भाकरी खाता यावी हा आमच्या बौद्ध समाज बांधवांचा प्रयत्न आहे. आपली मुलं शिकली पाहिजेत, शाळेत गेली पाहिजेत, स्पर्धेत उतरली पाहिजेत आणि मातंग समाज बांधवांनी यापुढे आता प्रयत्न केला पाहिजे.

माझ्या मातंग समाज बांधवांनो या आरक्षण उपवर्गीकरणामुळे आपल्या मातंग समाजाची भविष्यामध्ये उन्नती होईल असे तुम्हाला जर वाटत असेल तर मात्र डोक्यातून काढून टाका. तुम्हाला भटकवल्या जात आहे. तुमचं घर तोडल्या जात आहे. हा या मनुवादी समाजव्यवस्थेचा मनसुबा तुम्ही ओळखा नाही तर उद्याचं भविष्य, उद्याच्या तुमच्या पिढीचं आयुष्य अंधारमय असेल बांधवांनो हे सर्वप्रथम समजून घ्या.

आज रोजी मातंग समाज बांधवांची जी काही उन्नती जो काही विकास झालेला आहे आणि आज रोजी होत आहे तो केवळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच हे लक्षात घ्या. आरक्षण उप वर्गीकरण म्हणजेच तुमचा विकास नव्हे तर तुमच्या हजारो पिढ्या अधोगतीच्या मार्गानेच भ्रमण करतील ते वास्तव चित्र आहे

आज तुम्ही महारांना म्हणजेच बौद्धांना टार्गेट करताय ही पूर्णपणे तुमच्या डोळ्यावर भाजपाने उभे केलेलं भूत आहे.

अहो पूर्वाश्रमीचा महार आणि आजचा बौद्ध नेहमीच मनुवादी समाज व्यवस्थेला टार्गेट झालेलाच आहे. या समाजाला स्वतःच्या जीवाची पर्वा नाही. परंतु तुम्ही जे आज घराघरांमध्ये वाद निर्माण केला तो तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या माझ्या मातंग बांधवांनो. आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद, साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे, विद्रोही साहित्यिका विद्रोही लेखीका मुक्ता साळवे, या मातंग समाजातल्या महान या वीरांचे महान क्रांतिकारकांचे विचार त्यांची पुस्तकं त्यांच्या पुस्तकात काय दडलय काय लिहिले हे मात्र मातंग समाजाने वाचलेले नसावं. त्यांच्या साहित्यातून त्यांच्या लेखनातून त्यांच्या विचारातून कधीच त्यांनी मातंग समाज हा स्वतंत्र झाला पाहिजे त्याला स्वतंत्र आरक्षण मिळायला पाहिजे किंवा तो स्वतंत्र असला पाहिजेत असा कधीच त्यांनी कांगावा केलेला नाही आणि सरकारकडे सुद्धा मागणी केलेली नाही.

आयुष्यभर लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे या महान विभूतींना किती यातना, किती त्रास सहन करावा लागला. दीड दिवस शाळेत गेलेला हा मातंग समाजातला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा एक साक्षीदार एक दीपस्तंभ म्हणून उदयाला आलेला आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानून श्वास सोडलेला महान लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार वाचा हाच माझा माझ्या मातंग समाज बांधवांना सल्ला आहे.

माझ्या बौद्ध बांधवांनो तुम्हाला निर्वाणीच्या सावधतेचा इशारा देतो की, आज इथली मनुवादी समाज व्यवस्था यानी अनुसूचित जातीमध्ये फुट पाडण्याचा जो काही प्रयत्न सुरू केलेला आहे उपवर्गीकरणाच्या नावाखाली तो आपण ओळखा आणि सर्व गट तट बाजूला सारुन एक व्हा आणि या सरकारच्या मनुवादी विचारातला त्वरित मातीत गाडा नाहीतर उद्याचं भविष्य सुद्धा हे कठीण आहे हे समजून घ्या. आपल्याला पूर्वीपासूनच संघर्ष केल्याशिवाय काही मिळाले नाही पण आपला संघर्ष हे त्यागाचे प्रतीक आहे. आणि तै केल्याशिवाय काही मिळत नाही आणि सरकारला सुद्धा माहित आहे हा बौद्ध समाज जर रस्त्यावर उतरला तर तो न्याय मिळवल्याशिवाय राहत नाही त्यासाठी तुम्हाला आजच हा सल्ला आहे, इशारा आहे की, सावध व्हा एका छताखाली या. आणि इथल्या या मनुवादी सरकारला धारेवर धरा. कोणत्याही परिस्थितीत अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण सरकार लागू करणार नाही याबाबत सरकारला धारेवर धरा आणि सावध व्हा.

उद्याच्या हजारो पिढीचे जर आयुष्य या मनुवादी सरकारच्या एका निर्णयामुळे उध्वस्त होत असेल तर याला जबाबदार सरकार नाही तर स्वतः मी इथला बौद्ध,मातंग मांग महार, चांभार हा जबाबदार असेल आणि याच पिढ्या भविष्यामध्ये तुम्हाला विचारेल की तुम्ही आमचे आयुष्य बरबाद केलं पुन्हा आम्हाला तुम्ही हजारो वर्ष जातीवादी मनुवादी यांच्या गुलामगिरीच्या साखर दंडात बांधले असा जवाब विचारतील तेव्हा तुमच्याकडे उत्तर नसेल.

उठा सावध व्हा आणि या मनुवादी सरकारच्या या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोठा लढा उभा करा बस एवढाच सल्ला.

या लेखांमध्ये कोणाच्याच भावना दुखवण्याचा मी प्रयत्न केलेला नाही जे वास्तव आहे ते मात्र मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.

दशरथ एन.सुरडकर

(मुख्य संपादक) दैनिक माझा मराठवाडा 

वास्तव विश्लेषण…..

7558316467

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार