Home / Uncategorized / कृषी विभागात ‘कर्मचाऱ्याची विशेष कार्य अधिकारी पदाची तोतयागिरी बदल्यांचे रॅकेट आणि बिनकामाचा फुल पगार कारभाराचा पर्दाफाश..!

कृषी विभागात ‘कर्मचाऱ्याची विशेष कार्य अधिकारी पदाची तोतयागिरी बदल्यांचे रॅकेट आणि बिनकामाचा फुल पगार कारभाराचा पर्दाफाश..!

 देऊळगाव राजा प्रतिनिधी मुन्ना ठाकूर

सध्या राज्यात वेगवेगळ्या सत्तेवरील मंत्र्यांची स्वीय सहाय्यक, विशेष कार्य अधिकारी पदावरील अधिकारी कर्मचारी यांच्या घोटाळे उघडकीस येत असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या दोन शिफारस पत्राने बेकायदेशीर पद्धतीने पात्रता नसताना विशेष कार्य अधिकारी पद मिळवून कृषी विभागात तोतयागिरी केली आहे. तालुका कृषी अधिकारी राहुरी कार्यालयातील सोमनाथ बाचकर या वर्ग तीनच्या उपकृषी अधिकारी पदावरील कर्मचाऱ्याने बदल्यांचे रॅकेट चालवून बेनामी संपत्ती कमावण्यासाठी विधान परिषद सभापती राम शिंदे यांचे शिफारस पत्र तयार करून या घोटाळ्यात चापडगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील बापूसाहेब शिंदे तालुका कृषी अधिकारी राहुरी , दत्तात्रय गावसाने विभागीय कृषी सहसंचालक पुणे, रोहिदास खोकले कक्ष अधिकारी मंत्रालय यांच्याशी आर्थिक देवाण-घेवाण करून संगणमताने बेकायदेशीरपणे विशेष कार्य अधिकारी कदाचित बेकायदेशीर आदेश मिळवले. विधान मंडळ सचिवालयाने 19 अधिकारी कर्मचारी विधानपरिषद सभापती यांच्या आस्थापनेवर आदेश व आकृतीबंध माहिती अधिकारातून सार्वजनिक करत सोमनाथ बाचकर नावाची कोणतीही व्यक्ती सभापती राम शिंदे यांच्या आस्थापनेवर नसल्याचे अधिकृतपने स्पष्ट केले विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने व बापूसाहेब शिंदे तालुका कृषी अधिकारी यांनी पूर्वलक्षी प्रभावाने कार्यमुक्त करण्याचे बेकायदेशीर आदेश काढले. तसेच जवळपास विधानसभा निवडणुकीपासून प्रचार इत्यादी कामासाठी सोमनाथ बाचकर यांना कृषी विभागाच्या कामातून सूट दिल्याचे बोलले जाते. पूर्वलक्षी प्रभावाने कार्यमुक्त केल्यानंतर कुठलाच हजार उपस्थिती अहवाल नसताना सोमनाथ बाचकर यांचा पगार तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी काढला. सोमनाथ बाचकर यांच्या उपस्थितीची खात्री करण्याचे जबाबदारी दत्तात्रय गावसाने व बापूसाहेब शिंदे या दोन्ही अधिकाऱ्यांवर असूनही बाचकर यांचा पगार निघणे यात काही अधिकारी बाचकर बेकायदेशीर नियुक्ती मागे व तोतयागिरी, शासकीय फसवणूक या गुन्हेगारी कटात असल्याचे स्पष्ट करते. सोमनाथ बाचकर अनेक वर्षापासून संघटना, सोसायटीच्या राजकारणात देखील कार्यरत राहून कृषी विभागाच्या मूळ कामांपासून दूर राहिला आहे. आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करत व राम शिंदे यांच्याशी संधान साधत कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या मंत्रालय, कृषी आयुक्तालय,विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाशी नाळ जोडत कोट्यावधीची बेनामी संपत्ती कमावली आहे. विधान परिषद सभापती राम शिंदे यांनाही यातून आर्थिक फायदा होत असल्याने बाचकर यांच्या तक्रारी माहीत होऊनही बाचकर यांना अभय दिले. बाचकर यांच्या बनावट विशेष कार्य अधिकारी पदाचा कृषी विभागाकडे पुराव्यासह तक्रार देखील झाल्याची माहिती समोर आली असून कृषी विभागातील अधिकारी बाचकर हे बदल्या कनेक्शन मधील जुना दलाल असल्याने व राम शिंदे यांच्या राजकीय दबावाच्या भीतीने बाचकर या शासकीय पदावरील कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यास धजत नसल्याचे दिसत आहे. तसेच यातील प्रमुख आरोपी दत्तात्रय गावसाने ३१ मे ला निवृत्त होत असल्याने त्यांना कारवाई पासून वाचविण्यासाठी शासन दोषींवर कारवाई करत नसल्याचे बोलले जाते.

कृषी विभागातील प्रशासकीय शिस्तीचे धिंडवडे उडवणारा आणि शासकीय तिजोरीची दिवसाढवळ्या लूट करणारा हा प्रकार असून केवळ बदल्यांमधून माया कमावण्यासाठी राजकीय दबावापोटी हे प्रकरण अधिकारी दडपवत असल्याचे समजते. एकीकडे शासन शेतकरी हिताच्या विविध योजना राबवत असताना काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाया करून शिस्तीचे धडे देतात आणि दुसरीकडे ९-१० महिन्यांपासून एकही दिवस काम न करता घरात बसून लाखो रुपयांचा सरकारी पगार लाटण्याची सोमनाथ बाचकरला मुभा देऊन अधिकारी जावयासारखे लाड पुरवत असल्याचे दिसते.

या प्रकरणाचा पूर्वेतिहास पाहिला तर, संशयित आरोपी सोमनाथ बाचकर हा मूळचा कृषी विभागात केवळ ७ वी पास पात्रता आवश्यक असलेल्या माळी पदावर 1998 मध्ये नियुक्ती झाली. त्यानंतर कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक अशा पदोन्नत्या घेतल्या आतापर्यंत या महाशयांनी मात्र, कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैसे देवाण-घेवाण करणारा ‘प्रमुख दलाल’ म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती. हा बदल्यांचा बाजार अधिक सोयीस्करपणे चालवण्यासाठी त्याने स्वतः ‘स्वीय सहाय्यक’, ‘विशेष कार्य अधिकारी’ OSD असल्याचा बनाव रचला आणि शासकीय कार्यालयांमध्ये स्वतःचे सत्कार घडवून आणले. तसेच कनिष्ठ असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहकार्यांना धमक्या देणे, दबावात ठेवणे असले कार्य सोमनाथ बाचकर यांनी केले आहे. काम न करता फुकट पगार घेणे, उपस्थिती व हजर अहवालाशिवाय पगार काढणे, पूर्वलक्षी प्रभावाने कार्यमुक्त करणे हे सर्व बाचकर यांच्या तोतयागिरीला प्रोत्साहन देणारे, संगनमताने केलेला गुन्हेगारी कट व भ्रष्टाचार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार