मानोरा प्रतिनिधी : सुधीर ढगे
आज दिनांक 24/05/2026 रोजी पोलीस स्टेशन मानोरा अंतर्गत आगामी Bakrid (बकरी ईद) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. सदर रूट मार्च ग्राम गिरोली येथील बौद्ध विहार ते जामा मस्जिद, Chhatrapati Shivaji Maharaj Chowk, मोहम्मदिया मस्जिद, टिपू सुलतान चौक ते ग्रामपंचायत या महत्त्वाच्या मार्गावर सकाळी 11.54 ते 12.20 वाजेपर्यंत पार पडला.

सदर रूट मार्चमध्ये 3 चारचाकी वाहने, 2 मोसा, 5 अधिकारी, 23 अंमलदार तसेच RCP पथक सहभागी झाले होते. रूट मार्च दरम्यान नागरिकांना शांतता, बंधुता व कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
रूट मार्चनंतर सर्व अधिकारी व अंमलदार यांना नींबू शरबत व एनर्जी ड्रिंक देण्यात आले असून त्यानंतर सर्वांना आपापल्या पोलीस ठाणे/पोस्टे येथे रवाना करण्यात आले.
सेवेशी सविनय सादर.






