छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी :- गोकुळसिंग राजपूत
संशयास्पद वाहनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्या; डायल 112 वर संपर्काचे आवाहन
सोयगाव; फर्दापूर येथे गोतस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई; फर्दापूर पोलिसांचा इशारा
“सजग नागरिक – सुरक्षित समाज” उपक्रमातून जनजागृती
गोतस्करी मुक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज
गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिस प्रशासनाला द्यावी, असे आवाहन फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी केले आहे.
सोयगाव व फर्दापूर परिसरात गोवंशाची अवैध वाहतूक, गोतस्करी अथवा अवैध कत्तलखान्यांबाबत कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास नागरिकांनी कोणताही कायदा हातात न घेता तात्काळ डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रफुल्ल साबळे यांनी केले आहे
अफवा पसरवून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याऐवजी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही सपोनि प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले. गोतस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
पोलीस प्रशासन, परिवहन विभाग तसेच पशुसंवर्धन विभाग संयुक्तपणे कार्यरत असून अवैध वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सुरक्षित व कायद्याचे पालन करणारा समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
“सजग नागरिक – सुरक्षित समाज” या संदेशातून जनजागृती करण्यात येत असून गोतस्करी मुक्त जिल्हा करण्यासाठी जनतेने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तत्काळ संपर्क :
डायल 112
फर्दापूर पोलीस – आपल्या सेवेत सदैव तत्पर ।







