Home / Uncategorized / फत्तेपूरच्या सहकार विद्या मंदिरात मुलींची दमदार बाजी; ऋतुजा पाटील केंद्रात प्रथम…

फत्तेपूरच्या सहकार विद्या मंदिरात मुलींची दमदार बाजी; ऋतुजा पाटील केंद्रात प्रथम…

 जामनेर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

दहावी निकालात सहकार विद्या मंदिराचा झेंडा उंचावला; ऋतुजा पाटीलला ९७.६० टक्के

जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील सहकार विद्या मंदिराने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे आयोजित इयत्ता दहावी (SSC) फेब्रुवारी २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत परिसरात मानाचा तुरा रोवला आहे. यावर्षीच्या निकालात मुलींनी विशेष चमकदार कामगिरी करत विद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली आहे.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनी ऋतुजा रमेश पाटील(राजपूत ) तोरनाळा हिने तब्बल ९७.६० टक्के गुण मिळवत केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उज्ज्वल यशामुळे विद्यालयासह संपूर्ण फत्तेपूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऋतुजाच्या यशाबद्दल शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तसेच जयश्री दत्तू कोळी हिने ९४.८० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला असून प्रथमेश पंढरी बडार याने ९३.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे. विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होत शाळेचा गौरव वाढविला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, पालकांचे मार्गदर्शन तसेच शिक्षकांचे परिश्रम महत्त्वाचे ठरल्याची भावना मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या यशामुळे विद्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

“आजची मेहनत हेच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवते,” असे सांगत विद्यालय प्रशासनाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील काळातही विद्यार्थी विविध क्षेत्रात यश संपादन करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त ऋतुजा पाटील राजपूतचे रमेश पाटील राजपूत तोरनाळा यांच्या कडून करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार