चिखली:
शहरातील गजबजलेल्या बॉम्बे मार्केट परिसरात आज सकाळी भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. बॉन्द्र पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या जहीर खान कुरेशी यांच्या भंगार दकानाला अचानक आग लागल्याने परिसरात धराचे प्रचंड लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आग इतकी भीषण होती की काही वेळातच दकानातील मोठ्या प्रमाणातील भंगार साहित्य जळन खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथामिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोल पंपाच्या अगदी शेजारीच आग लागल्यामळे काही काळ मोठा अनर्थ घडण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र. स्थानिक नागरिक. व्यापारी आणि अग्निशमन विभागाच्या तत्परतेमळे आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठी दर्घटना टळली घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले. आग नेमकी कशाम्ळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत तपास सरू आहे. शहराच्या मध्यभागी घडलेल्या या घटनेमळे चिखलीत एकच खळबळ उडाली आहे






