मानोरा प्रतिनिधी: सुधीर ढगे
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत मोठी चुरस पाहायला मिळाली. या निकालांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या मजबूत गडाला धक्का बसत भारतीय जनता पक्ष (भाजप) ने महत्त्वपूर्ण यश मिळवले, अशी माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर मानोरा येथे सायंकाळी सहा वाजता भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. “जय श्रीराम”, “हर हर मोदी, घर घर मोदी” अशा घोषणा देत वातावरण दणाणून गेले.
या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, राजू देशमुख, डॉ. अविनाश लोटे, श्याम डोळस, अमोल राऊत, प्रमोद ठाकरे, डॉ. सुहास देशमुख, महादेवराव ठाकरे, डॉ. नवल देशमुख, दिलीप चव्हाण, भैय्या देशमुख, विनायक पाटील, संतोष रत्नपारखी, अतुल राऊत, श्याम शिंदे तसेच इतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा देत त्यांचा जयघोष केला. संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण व जल्लोषमय झाले होते.






