Home / Uncategorized / नरसापूर चिमुकली प्रकरणी सकल महिला देऊळगाव राजाचे निवेदन…!

नरसापूर चिमुकली प्रकरणी सकल महिला देऊळगाव राजाचे निवेदन…!

देऊळगाव राज: उमा जैवाळ 

पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीस कठोरातील कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी सकल महिला देऊळगाव राजा तालुक्याच्या वतीने तहसीलदार डोंगरजाळ मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

हे निवेदन प्रतीक्षा ताई कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी देऊळगाव राजा तालुक्याच्या माजी नगराध्यक्ष मालती ताई कायंदे, उपनगराध्यक्ष वनिता ताई भुतडा, नगरसेविका अलका ताई धन्नवत, सविता ताई पाटील, पूजा ताई खांडेभराड, रेणुका ताई गुंडे, संगीता ताई मोगरकर, अमृता ताई पैठणकर, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या सुनंदा दीदी, देवकल दीदी तसेच आदरणीय सुभाष दराडे, नगरसेवक निशिकांत भावसार, प्रविण सेठ धन्नवत, सुजित गुंडे आणि प्रभाकर खांडेभराड आदी उपस्थित होते.

या घटनेतील आरोपीस कठोर शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार