Home / Uncategorized / वाकडी शिवारातील सोलर साहित्य चोरीचा गुन्हा उघड; दोघे आरोपी अटकेत…

वाकडी शिवारातील सोलर साहित्य चोरीचा गुन्हा उघड; दोघे आरोपी अटकेत…

 

जामनेर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत 

रात्रीच्या गस्ती दरम्यान संशयितांना ताब्यात घेऊन फत्तेपूर पोलिसांची कारवाई; 35 हजारांचा मुद्देमाल जप्त…

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथील दि.४/५/२६ रोजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाकडी शिवारात घडलेल्या सोलर साहित्य चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी वेगाने छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून सुमारे 35 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.02 मे रोजी रात्री गस्त घालत असताना पोलिसांना दोन संशयित इसम मोटारसायकलवरून वाकडी शिवारात फिरताना आढळले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या जवळ लोखंडी कटर आढळून आला तसेच त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

दरम्यान, वाकडी येथील शेतकरी कांतीलाल रामलाल राजपूत यांच्या शेतातील सोलर सिस्टीमचे स्टार्टर, पाण्याच्या मोटारीचे स्टार्टर व झटका मशीनची बॅटरी असा एकूण 35,600 रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी राजेंद्र उर्फ राजू रमेश जाधव (कोळी) व शुभम सुनील वाघ (दोघे रा. वाकडी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून सोलर मोटार स्टार्टर, इतर स्टार्टर व बॅटरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपींच्या घराची झडती घेतली असता पानबुडी मोटार, इलेक्ट्रिक केबल, मोटार स्टार्टर व इतर साहित्यही हस्तगत करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस नाईक तुषार इंगळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार