Home / Uncategorized / जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोळीबोडखा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा…!

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोळीबोडखा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा…!

 

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार 

पाचोड :- दि. १ मे २०२६ : कोळी बोडखा (ता. पैठण जिल्हा. छत्रपती संभाजी नगर)येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप पोटफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशभक्तीपर वातावरण अनुभवले.

कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक तुकाराम ढोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली असून हा दिवस जागतिक स्तरावर ‘कामगार दिन’ म्हणूनही साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले. मेहनती कामगारांच्या योगदानाचा गौरव व त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यानंतर ‘नशामुक्ती’ या विषयावर शिक्षक व आशा कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विकास आंधळे यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक-शिक्षिकांना नशामुक्तीची शपथ दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सविता जगताप यांनी केले. कार्यक्रमास मराठी माध्यमचे मुख्याध्यापक तुकाराम ढोले, उर्दू माध्यमचे मुख्याध्यापक इम्राहीम शेख, ग्रामविकास अधिकारी हेमा आचले, अंगणवाडी सेविका आम्रपाली गायकवाड, आशा कार्यकर्त्या सुजाता सुवर्णकार व लंका मुसळे, ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी जमीर शेख, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश ठोके शिक्षक आंधळे, ढवळे तसेच शिक्षिका जगताप, गंगथडे, सुमेरा, तनवीर, गहेरवार आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रगतीपत्रकांचे वाटप केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार