Home / Uncategorized / जि.प. समाजकल्याणच्या २०% उपकर निधीतून ८७ लाभार्थ्यांना साहित्य वाटप; सभापती उत्तम चव्हाण यांच्या हस्ते मंजुरीपत्र प्रदान..

जि.प. समाजकल्याणच्या २०% उपकर निधीतून ८७ लाभार्थ्यांना साहित्य वाटप; सभापती उत्तम चव्हाण यांच्या हस्ते मंजुरीपत्र प्रदान..

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

सोयगाव, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या २०% उपकर निधीअंतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेतून तालुक्यातील ८७ पात्र लाभार्थ्यांना विविध साहित्य मंजूर करण्यात आले. पंचायत समिती सोयगाव येथे सभापती *मा. श्री. उत्तम चव्हाण* यांच्या हस्ते *श्री इद्रिस भाऊ मुलतानी* यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देऊन योजनेचे वितरण करण्यात आले.

वाटप केलेले साहित्य:

या योजनेतून पिकोफॉल मशीन, शिलाई मशीन, पीव्हीसी पाईप, संगणक संच तसेच पाच शेळी व एक बोकड युनिट अशा साहित्याचा समावेश आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व गरजू कुटुंबांना स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, हा या योजनेमागील मुख्य हेतू आहे.

याप्रसंगी सभापती *श्री उत्तम चव्हाण* म्हणाले, “जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गरजू घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. २०% उपकर निधीचा योग्य विनियोग करून लाभार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न आहे. लाभार्थ्यांनी मिळालेल्या साहित्याचा व्यवसायवाढीसाठी उपयोग करावा.”

यावेळी पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

पंचायत समिती सोयगाव येथे जिल्हा परिषद समाजकल्याण योजनेतील लाभार्थ्यांना सभापती *मा.उत्तम चव्हाण* यांच्या हस्ते मंजुरीपत्र देताना. सोबत अधिकारी व लाभार्थी.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार