Home / Uncategorized / जामठीतील पाणी टंचाईवर सभापतींचा दणका: ग्रामविकास अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश..

जामठीतील पाणी टंचाईवर सभापतींचा दणका: ग्रामविकास अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश..

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

सोयगाव तालुक्यातील जामठी येथे, १ मे २०२६ रोजी गेल्या काही दिवसांपासून जामठी गावात भेडसावणाऱ्या तीव्र पाणी टंचाईची गंभीर दखल घेत सोयगाव पंचायत समितीचे सभापती *श्री उत्तम चव्हाण* यांनी *मा.ईद्रिसभाऊ मुलतानी* यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले.

ग्रामस्थांकडून पाण्यासाठी होणाऱ्या तक्रारी वाढल्याने सभापती चव्हाण यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तातडीची बैठक बोलावून अधिकाऱ्यांना पाणी प्रश्न सोडवण्याच्या स्पष्ट सूचना केल्या.

आदेशातील ठळक मुद्दे:

1. टँकरद्वारे पुरवठा: पाणी टंचाई असलेल्या भागात दररोज किमान दोन वेळा टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा.

2. नळयोजना दुरुस्ती: नादुरुस्त पडलेल्या सार्वजनिक नळयोजना व हातपंप ४८ तासांत दुरुस्त करावेत.

3. विहीर अधिग्रहण*: आवश्यकतेनुसार खासगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा.

4. दैनंदिन अहवाल:

दररोज केलेल्या उपाययोजनांचा अहवाल पंचायत समितीकडे सादर करावा.

“पाण्याअभावी नागरिकांचे हाल होणे खपवून घेतले जाणार नाही. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल,” असा इशारा सभापती उत्तम चव्हाण यांनी यावेळी दिला.

सभापतींच्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून, प्रशासनान याची गंभीर दखल घेणार आहे .

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार