Home / Uncategorized / पाचोडमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या संपन्न..!

पाचोडमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या संपन्न..!

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार 

पाचोड :(ता. पैठण) महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद यांच्या वतीने घेण्यात येणारी प्राथमिक (इयत्ता चौथी) व उच्च प्राथमिक (इयत्ता सातवी) शिष्यवृत्ती परीक्षा आज दि. 26 एप्रिल 2026 रोजी पाचोड येथे अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत पार पडली. या परीक्षेसाठी दोन स्वतंत्र केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.

इयत्ता चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा जैन इंग्लिश स्कूल पाचोड येथे घेण्यात आली. या केंद्रावर केंद्र संचालक म्हणून श्री. खंबाट सर यांनी जबाबदारी पार पाडली, तर त्यांना सहायक म्हणून विजय लिहिणार सर यांनी सहकार्य केले. या केंद्रावर एकूण 231 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

तसेच इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जवाहर विद्यालय पाचोड हे केंद्र निश्चित करण्यात आले होते. या ठिकाणी केंद्र संचालक म्हणून कारके सर यांनी काम पाहिले. परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध कार्य केले.

दरम्यान, पाचोड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. बळीराम भुमरे सर यांनी दोन्ही केंद्रांना भेट देऊन परीक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला व आवश्यक सूचना दिल्या.

दोन्ही केंद्रांवर परीक्षा पूर्णपणे शांततेत, संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार