संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त क्रांती संघटनेच्या वतीने समाजसेवक सुमित पंडित व समाजसेविका पूजा पंडित यांचा डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व भव्य नागरी सत्कार सोहळा टीव्ही सेंटर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे आयोजन क्रांती संघटनेचे संस्थापक राहुल साळवे यांनी केले होते.समाजकार्याच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सुमित पंडित व पूजा पंडित यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत उपस्थितांनी त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी मंचावर अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत समाजात समानता, बंधुता व न्याय यांचे मूल्य रुजवण्याचा संकल्प व्यक्त केला.






