माणुसकी वृद्ध आश्रमातील वृद्धांचा आनंद द्विगणित केला
छत्रपती संभाजी नगर(छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार)
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माणुसकी वृद्धाश्रमात लागणाऱ्या किराणा साहित्य व फराळ भेट देऊन माणुसकी वृद्ध सेवालय येथे किराणा साहित्य पोहोच केले.आज प्रत्येकजन अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात आपल्या पुर्वजांच्या आठवणी त पुजा अर्चना करून भोजन दान करतो व त्या दिवशी दान करण्याची प्रथा आहे.मात्र रोडवर सापडलेल्या वृद्ध,बेवारस अवस्थेत आढळून आलेल्या माता बांधवांसाठी चालवल्या जाणाऱ्या या माणुसकी वृद्ध सेवालयामध्ये समाजसेवक सुमित पंडित पुजा पंडित शहरातील व ग्रामीन भागातील कुठल्याही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असे व्यक्ती आढळून आल्यास हक्काने त्यांच्या सेवालयामध्ये अन्न वस्त्र निवारा याकरिता कागदोपत्री पूर्तता करून दाखल केले जाते ते कुठल्याही शब्द न टाळता अशा वृद्धांची सेवा करतात म्हणून जिथे कोणी पोहोचत नाही तिथे आम्ही पोहोचण्याचे काम केले आहे. त्यामुळे आम्हाला खरंच आनंद झाला आहे.यावेळी विलास ढेंगे ग्रामसेवक व माणुसकी समुहाचे सुमित पंडित उपस्थित होते
माणुसकी वृद्ध सेवालयाच्या संचालिका पूजा पंडित यांच्या हस्ते कुमारी सौजन्या ढेंगे हिचा सीबीएससी बोर्ड परीक्षेत 98% गुण घेऊन ज्ञानदा इंग्लिश शाळेतून दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.





