Home / Uncategorized / जिल्हा परिषद सीईओ पी. एम. मिनू यांच्याशी इद्रिस मुलतानी यांची सिल्लोड- सोयगाव विकासावर सविस्तर चर्चा.

जिल्हा परिषद सीईओ पी. एम. मिनू यांच्याशी इद्रिस मुलतानी यांची सिल्लोड- सोयगाव विकासावर सविस्तर चर्चा.

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

सावळदबारा परिसरातील प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय बैठक

सिल्लोड;छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पी. एम. मिनू मॅडम यांच्यासोबत सिल्लोड, सोयगाव व सावळदबारा परिसरातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत स्टार प्रचारक तथा अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या चर्चेदरम्यान ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन योजना, शिक्षण व आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. विशेषतः सिल्लोड, सोयगाव व सावळदबारा परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी प्रशासनाने अधिक समन्वयाने काम करण्याची प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांच्या कडून मागणी करण्यात आली.

इद्रिस मुलतानी यांनी ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, प्रलंबित कामे लवकर पूर्ण करणे तसेच शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे मत व्यक्त केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिनू यांनी उपस्थित मुद्द्यांची गंभीर दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्याचे आश्वासन दिले. नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीमुळे सिल्लोड, सोयगाव व सावळदबारा परिसरातील विविध विकासकामांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार